beed crime news Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ

Water Dispute Turns Violent: शेतासाठी पाण्याच्या वादातून बाप लेकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना बीडमध्ये घडली असून, आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

शेतासाठी पाण्याच्या वादातून बाप लेकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यात दगड मारल्यानं अण्णासाहेब अर्जुन पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांचा मुलगाही जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शेतासाठी अडवलेले आमचे पाणी का घेतले?

अण्णासाहेब अर्जुन पवार असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेतासाठी अडवलेले आमचे पाणी का घेतले? असे विचारल्याने बाप लेकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अभिषेक गाडे, रामप्रसाद गाडे आणि गोकुळ गाडे या तिघांनी अण्णासाहेब पवार आणि त्यांच्या मुलावर हल्ला चढवला.

हल्ल्यात अण्णासाहेब पवार यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा मुलगाही मारहाणीत जखमी झाला आहे. या घटनेनंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी ठाण्यात अभिषेक गाडे, रामप्रसाद गाडे आणि गोकुळ गाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाला सुरूवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यसभेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु

बारामतीत राजकीय भूकंप! राष्ट्रावादीच्या 'या' बड्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा; ZP मधील प्रकरण भोवले

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १० तोळा सोनं ५००० रुपयांनी स्वस्त; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचे लेटेस्ट 5 डिझाईन्स, साडीवर दिसतील भारी

बस चालकाच्या घरात सापडलं घबाड; १५ किलो सोन्याचे बिस्किट्स, पैशांनी भरलेली ३५ पोती; नोटा मोजताना बंद पडल्या ५ मशीन्स

SCROLL FOR NEXT