Tik Tok Star Santosh Munde Death Saam TV
महाराष्ट्र

Santosh Munde Death : प्रसिद्ध Tik Tok स्टार संतोष मुंडेचा करंट लागून मृत्यू; मन सुन्न करणारी घटना

आपल्या हटक्या शैलीने नेटकऱ्यांना खळखळून हसवणाऱ्या टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

विनोद जिरे

Tik Tok Star Santosh Munde Death : आपल्या हटक्या शैलीने नेटकऱ्यांना खळखळून हसवणाऱ्या टिकटॉक स्टार संतोष मुंडे याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. विद्युत वाहक डीपीमधील फ्युज टाकत असताना अचानक वीज प्रवाह सुरू झाल्याने करंट लागून संतोष मुंडे यांच्यासह बाबुराव मुंडे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बीडच्या धारूर तालुक्यातील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Latest Marathi News)

संतोष मुंडे हा फेमस टिक टॉक स्टार असून याच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. हा अपघात नसून घातपात आहे, भोगलवाडी (Beed) येथील संतोष मुंडे हा आपल्या मित्रांसह काळेवाडी येथील विद्युत वाहक डीपीमधील फ्युज टाकण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानक वीज पुरवठा सुरू झाला अन त्यामध्ये विजेचा करंट लागून या दोघांचा मृत्यू झाला.

तर आपल्या अनोख्या अंदाजाने टिकटॉक स्टार म्हणून राज्यभर परिचित झालेल्या संतोष मुंडे याच्या दुर्दैवी मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. संतोष त्याच्या हटके स्टाईलसाठी ओळखला जायचा. संतोषचे लाखांवर फॉलोवर्स आहेत. अस्सल ग्रामीण शैलीमध्ये तो मनोरंजन करत होता. शेतामध्ये बसून तो कायमच टिक टॉकवर व्हिडीओ तयार करायचा.

दरम्यान, संतोषच्या निधनाची बातमी कळताच पोलिसांनी भोगलवाडीकडे धाव घेतली. त्याच्या मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सध्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हैराण आहे. दरम्यान या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या संतोष मुंडे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना, महावितरणने तातडीने मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोदींच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत भाजपनं साधला डाव; विरोधकांना चीतपट देण्यासाठी चव्हाण मैदानात

Political News: मोठी बातमी! काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपचे माजी आमदारावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा; पीडितेच्या जीवाला धोका असल्याचा दावा

Kalya Miriche Fayade: काळी मिरीची चिमूटभर पूड 'या' ६ पदार्थांसोबत खा, चमत्कार पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, साखरेच्या किमती लवकरच कमी होणार

SCROLL FOR NEXT