Vishnu Manohar  Saam tv
महाराष्ट्र

Vishnu Manohar : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहरांच्या फेसबुक पेजवरून अश्लील पोस्ट; भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले

vishnu manohar Facebook hack : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. हीच बाब सांगताना ते भर पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले. त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही

प्रसिद्ध व्यक्तींच्या फेसबुक अकाऊंट हॅक होण्याच्या घटनेत दिवसेदिवस वाढ होऊ लागली आहे. फेसबुक अकाऊंट करून इतरांची आर्थिक फसवणूक केली जाते. अकाऊंट हॅक होण्याच्या घटना वाढल्याने प्रसिद्ध व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागतो. तर काहींचं आर्थिक नुकसान देखील होतं. असाच प्रकार नागपुरातील प्रसिद्ध शेफसोबत घडला आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आलं आहे. त्यांच्या नावाने असणाऱ्या एका 'मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर' या फेसबुक अकाऊंटला हॅक करून त्यावर अश्लील पोस्ट करण्यात आल्याचे समोर आलं आहे.

फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे समजताच विष्णू मनोहर यांनी या सगळ्या संदर्भात सायबर पोलिसांना तक्रार केली. मात्र दहा ते बारा दिवस लोटूनही अद्यापही अकाउंट रिकव्हर करण्यात न आल्यामुळे त्या पोस्ट कायम सुरू आहेत. या पोस्टचा विष्णू मनोहर यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात नागपूर, बंगळूर, मुंबई पुणे आणि अमेरिकेतही यासंदर्भात तक्रारी केली आहे.

विष्णू मनोहर यांनी मेटासोबतही संपर्क साधला. मात्र अद्यापपर्यंत अकाऊंट रिकव्हर होऊ शकले नाही. 2000 रेसिपी असलेल्या अकाऊंटवर लाखो फॉलॉवर्स होते. मात्र गेल्या दहा ते बारा दिवसांमध्ये फॉलोवर्सची संख्या घटली आहे. फॉलोवर्स पेजला सोडून जात आहेत.

तसेच अनेक लोक त्यांना फोनद्वारे मेसेजद्वारे संदेश पोहोचवत आहे. अशा पद्धतीचे अश्लील पोस्ट का करत आहेत, असे प्रश्नही विचारत आहेत. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास त्यांचे अकाऊंट हॅक होऊ शकते. त्यामुळे चाहत्यांनी या लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन विष्णू मनोहर यांच्याकडून करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT