crime news Saam Tv
महाराष्ट्र

Buldhana News: 'माझ्या जीवाला धोका', कुऱ्हाड घेतली अन् काकाच्या डोक्यातच घातली, पुतण्याचा प्रताप

Buldhana nephew kills uncle: जुन्या कौटुंबिक वादातून पुतण्याने काकांवर कुऱ्हाडीने वार केले आहे. या हल्ल्यात काकांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

काका पुतण्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. जुन्या कौटुंबिक वादातून पुतण्याने काकांवर कुऱ्हाडीने वार केले आहे. पुतण्याने केलेल्या हल्ल्यात काकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत काकांनी आदल्या दिवशी पोलीस ठाण्यात पुतण्याविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुतण्याने काकांचा जीव घेतला. ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील सोनज या गावात घडली आहे.

शुभम विठ्ठल बोके या आरोपी पुतण्याने काकावर कुऱ्हाडीने हल्ला करत त्याची हत्या केली आहे. या हल्ल्यात गोपाळ मनोहर बोके यांचा जागीच मृत्यू झाला आहे. २८ मार्चला गोपाळ यांना पुतण्याने जुन्या वादातून मारहाण केली होती. मारहाणीनंतर काकांनी नांदुरा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

नांदुरा पोलीस ठाण्यात काकांनी आपल्या पुतण्याविरोधात तक्रार दाखल केली होती. 'माझ्या जीवाला धोका आहे', असं म्हणत गोपाळ यांनी पोलिसांना सांगितलं होतं. मात्र, पोलिसांनी आरोपी पुतण्यावर कोणतीच कारवाई केलेली नाही. २९ मार्चला सकाळी आरोपी पुतण्याने पुन्हा काकाला मारहाण केली. तसेच रागाच्या भरात काकावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.

या मारहाणीत गोपाळ रक्तबंबाळ झाले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणानंतर नातेवाईकांनी पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे गोपाळ यांची हत्या झाली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच पोलिसांनाही या प्रकरणात सहआरोपी करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

या घटनेनंतर नातेवाईकांनी नांदुरा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाला सुरूवात केली आहे. पोलिसांनी तपास करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठवले असून, पोलीस पुढील तपास करीत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honeymoon Destinations: डिसेंबरमध्ये हनिमूनचा प्लॅन करताय? ५ ड्रीम डेस्टिनेशन्स समोर परदेशही वाटेल फिका

IPS Officer Transfer: मोठा प्रशासकीय फेरबदल! ३ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

October Heat : ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा तडाखा! आताच जाणून घ्या स्किन केअरच्या ५ स्मार्ट ट्रिक्स

Aishwarya Rai: पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्या रायचा ग्लॅमरस लूक; डोक्यावर क्राऊन अन् ब्लॅक वेलवेट गाऊनने वेधलं लक्ष

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

SCROLL FOR NEXT