Insurance Fraud Saam Tv
महाराष्ट्र

Insurance Fraud: जमिनीवर पेट्रोल पंप, 7/12 वर कांदा; राज्यात बोगस पीक विम्याचा पर्दाफाश

Fake Crop Insurance Fraud: ७१ शेतक-यांनी कांद्याचा पीक विमा काढला. यासाठी त्यांनी ४२२ हेक्टर जमिनीवर कांदा असल्याचं दाखवलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद पाटील, साम टिव्ही

राज्यात पीक विम्याचा मोठा घोटाळा उघड झालाय. नाशिक जिल्ह्यात चक्क एनए प्लॉट आणि पेट्रोल पंपाच्या जमिनीवर कांदा पिकाची नोंद करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शेकडो शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम लाटण्यासाठी हे गौडबंगाल केल्यानं मोठं रॅकेट सुरू असल्याचं समोर आलंय. नेमका काय आणि कुठं सुरू आहे.

राज्यात पुन्हा एकदा बोगस पीक (Crop) विम्याचा पर्दाफाश झालाय. बोगस शेतक-यांनी चक्क एनए जमिनींवर कांद्याचं पीक दाखवून सरकारला कोट्यवधींचा चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काही ठिकाणी तर जमिनीवर पेट्रोल(petrol) पंप उभा असून सात बारावर मात्र चक्क कांद्याचं पीक दिसतंय.

नाशिक जिल्ह्यात या पीक विमा रॅकेटचा पर्दाफाश झालाय. एकट्य़ा मालेगाव तालुक्यात तब्बल 500 हेक्टर जमिनीवर बा बोगस पीक विमा काढल्याचं उघड झालंय. तब्बल चार कोटी रुपये लाटण्याचा कट या बोगस शेतकऱ्यांनी केला होता. मात्र वेळीच शासनाच्या चौकशीतून हे लक्षात आल्यानं या बोगस शेतक-यांचं बिंग फुटलंय. नेमका किती जणांनी कशाच्या आधारे हा घोटाळा केला ते पाहूयात.

कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या बोगस शेतक-यांचं बिंग फुटल्यानंतर आता कृषी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केलीय. या बोगस शेतक-यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

हे कमी होतं की काय तब्बल आठ जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कांद्याची लागव़ड आणि विम्याचे प्राप्त झालेल अर्ज यात मोठी तफावत आढळून आलीय़. आठ जिल्ह्यात 4 लाख 2398 शेतकऱ्यांनी दोन लाख 24 हजार 318 हेक्टरवर कांदा पिकाची लागवड केली आहे. यात 83 हजार 911 शेतकऱ्यांनी 49 हजार 935 हेक्टरवर कांदा लागवड न करताच विमा उतरवल्याचं समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT