Fake Currency report  Saam tv
महाराष्ट्र

Fake Currency Racket : वाशिममध्ये बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश, ४ जणांच्या मुसक्या आवळल्या

Washim fake currency racket : वाशिममध्ये राष्ट्रीय महामार्गावर बनावट नोट रॅकेटचा पर्दाफाश. ४ आरोपी अटकेत, ७ लाखांच्या बनावट नोटा, मोबाईल, शस्त्रे जप्त. आणखी दोन आरोपी फरार. पोलिसांची कारवाई सुरू. सविस्तर माहिती येथे वाचा...

Namdeo Kumbhar

मनोज जैयस्वाल, वाशिम प्रतिनिधी

Fake Currency Racket Busted in Washim : वाशिमच्या पोहरादेवी ते कोळवण फाटा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळच्या सुमारास मानोरा पोलिसांनी फसवणूक आणि दरोड्याच्या तयारीप्रकरणी मोठी कारवाई केली. दोन लाख रुपयांच्या खऱ्या चलनाच्या मोबदल्यात सात लाख रुपये बनावट नोटा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे साहित्य, बनावट नोटा, मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त करण्यात आल्या.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये संतोष साहेबराव पवार (वय ३८), साईनाथ नामदेव सोळंके (वय २९), जयदेव विजय सोळंके (वय ३७) सर्व रा. घातोडी ता. पुसद जि. यवतमाळ आणि जुनेद खान रियाज खान पठाण (वय २८, रा. हातगाव ता. हातगाव जि. नांदेड) यांचा समावेश आहे. तसेच इतर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी कारवाई करताना दोन लोखंडी रॉड, मिरची पावडर, चाकू, कटर यासह दरोड्यासाठी वापरण्याचे साहित्य, भारतीय चलनासारख्या दिसणाऱ्या आणि ‘फुल टू फन’ अशा बनावट नोटा, चार मोबाईल फोन आणि दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक विजय अजमिरे, अभिजीत बारे, पोलीस . हेड कॉन्स्टेबल राहुल जयसिंगकार, पोलीस कॉन्सेबल मनिष आगलदरे आणि फिरोज खान यांच्या पथकाने केली असून संबंधित आरोपींविरुद्ध फसवणूक व दरोड्याची तयारी अशा गंभीर गुन्ह्याखाली मानोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT