solapur news  Saam tv
महाराष्ट्र

नागपूरनंतर सोलापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट; पोलिसांकडून विक्री करणारी टोळी जेरबंद, अशी अडकली जाळ्यात

solapur news : नागपूरनंतर सोलापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. पोलिसांनी बनावट नोटा विक्री करणारी टोळी जेरबंद केली आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापुरात बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बाजारात बनावट नोटा आढळल्याने नागरिकांमध्ये पसरली भीती

पोलिसांकडून आरोपींना अटक करून तपास सुरू

नागपूरच्या कामठीनंतर आता सोलापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला सोलापुरात जेरबंद करण्यात आलं आहे. बाजारात बनावट नोटा आढळू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांकडून बनावट नोटा तयार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सोलापुरात बनावट नोटा तयार करू बाजारात विक्री करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे.सोलापूरच्या बाजारात बनावट चलन चालवण्याचा डाव फसल्याचे समोर आलं आहे. सोलापुरातील जेलरोड पोलिसांनी एक लाख दहा हजार रुपये किंमतीच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या. यावेळी जेलरोड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. बनावट नोटा प्रकरणाचे कनेक्शन सांगोल्यापर्यंत असल्याची माहिती मिळत आहे.

झेरॉक्स मशीनवर बनावट नोटा तयार करून त्या खऱ्या असल्याचा भास निर्माण करत बाजारात चालवण्याचा डाव जेलरोड पोलिसांनी उधळून लावलाय. राजू विश्वनाथ चोरमुले आणि अतुल भागवत तावरे असे सांगोला येथील दोन आरोपींना अटक केली. नोटा झेरॉक्स काढून खऱ्या नोटांसारख्या तयार केल्याचे उघड झालं आहे.

जेलरोड पोलिसांनी एक खबरीच्या माध्यमातून 35 हजाराच्या मोबदल्यात एक लाख दहा हजार बनावट नोटा देण्याचं आमिष दाखवून सापळा लावला होता. या प्रकरणात आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तत्पूर्वी, नागपूरच्या कामठीत बनावट नोटांचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणी तीन व्यापार्‍यांना अटक केली. या कारवाईने नागपूरकरांचंही टेन्शन वाढलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

भोंदू खरातनंतर CA चे पराक्रमाने खळबळ, उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे, सगळी यादीच समोर

नवी मुंबईतही 'अशोक खरात'! आदर्श म्हात्रेचे कारनामे एकूण चक्रावाल, ४०महिलांवर लैंगिक अत्याचार

IPL 2026: रोहित-रिकेल्टनचं तुफान आणि बुमराह-शार्दूलची जादू; या ५ कारणांमुळे मुंबईचा दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT