पुण्यात भारतीय हवाई दलाचे विमान कोसळल्याचा दावा खोटा
बारामती विमान अपघाताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
बारामतीत कोसळलेले विमान हवाई दलाचे नाही
बारामतीमध्ये खासगी प्रशिक्षण विमान कोसळल्याचा व्हिडीओ
पुणे जिल्ह्यातल्या बारामतीमध्ये विमान कोसळल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे विमान भारतीय हवाई दलाचे असल्याचा दावा केला जात आहे. लँडिंग करत असताना हे विमान कोसळले असून यामध्ये पायलट जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये कोसळल्या विमानाच्या भोवती गर्दी झाल्याचे दिसत आहे. आम्ही या व्हिडीओमागचे सत्य तपासून पाहिले तर हा व्हायरल होणारा व्हिडीओ खरा आहे पण ते विमान हवाई दलाचे नाही. त्यामुळे हा व्हिडीओ शेअर करत करण्यात आलेल्या दावा हा खोटा असल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ भारतीय हवाई दलाचा नाही. तर ९ ऑगस्ट २०२६ रोजीचा आहे. पुणे जिल्ह्यातल्या बारामती विमानतळाजवळ एका खासगी कंपनीचे प्रशिक्षण विमान कोसळले होते. या विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाले होते. लँडिंग करत असताना हे विमान कोसळलं. या विमानात पायलटसह दोन जण होते. या अपघातामध्ये जिवीतहानी झाली नाही. दोघेही जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या विमान अपघातानंतरचा व्हिडीओ समोर आला होता. तो व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची तपासणी करत असताना आम्हाला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजेच पीआयबीची पोस्ट आढळून आली. या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, हा व्हिडीओ पुणे जिल्ह्यातल्या बारामती विमानतळाजवळचा आहे. हे विमान एका खासगी कंपनीचे असून ते प्रशिक्षण विमान आहे. ९ ऑगस्ट २०२६ ला बारामती विमानतळाजवळ हे विमान कोसळले. हे विमान लँडिंगदरम्यान धावपट्टीवरून घसरले. यामध्ये कुणाचा मृत्यू झाला नाही तर २ जण जखमी झाले.
त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जो दावा केला जात आहे की ते कोसळलेले विमान भारतीय हवाई दलाचे आहे तर ते खोटं आहे. कारण हे विमान हवाई दलाचे नव्हते हे सत्य समोर आले आहे. त्यामुळे अशा व्हायरल होणाऱ्या आणि त्याद्वारे पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.