व्यावसायिक अभ्यासक्रमांचे अर्ज भरण्यास CET Cell कडून मुदतवाढ SaamTv
महाराष्ट्र

व्यावसायिक अभ्यासक्रमांचे अर्ज भरण्यास CET Cell कडून मुदतवाढ

एकूण ८ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या CET अर्ज भरण्याची मुदत दि.२ ऑगस्ट २०२१ पासून ८ दिवसांनी वाढवण्यात आली आहे.

Krushnarav Sathe

पुणे : कोरोना संसर्गाच्या आणि पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलकडून CET CELL कडून विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या CET अर्जामध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे. २९ जुलै रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. परंतु यामध्ये मुदतवाढ देत दिनांक २ ऑगस्ट २०२१ पासून पुढील ८ दिवसांपर्यंत विद्यार्थ्यांना CET साठी अर्ज करता येणार आहेत.

या अभ्यासक्रमांमध्ये -

विधी (Law) ५ वर्ष (एकात्मिक) आणि विधी ३ वर्ष

बी.एड (B.ed)

एम.एड (M.Ed)

बी.पी.एड (B.P.Ed)

एम.पी.एड (M.P.Ed)

बी.ए.बी.एड/बी.एस्सी.बी.एड (एकात्मिक) (BA/B.Sc B.ed)

बी.एड-एम.एड (एकात्मिक) B.Ed-M.Ed

अशा एकूण ८ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या CET अर्ज भरण्याची मुदत दि.२ ऑगस्ट २०२१ पासून ८ दिवसांनी वाढवली आहे.

या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी-सेल) राबविली जात आहे. दिनांक २९ जुलै रोजी सीईटी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. परंतु संध्या महाराष्ट्रामध्ये असलेली पूरस्थिती व कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी पाहता व सुरु असलेल्या विविध अभ्यासक्रमातील परीक्षा यामुळे राज्यभरातील विद्यार्थ्यांना सीईटी साठी अर्ज भरता आला नाही. या बाबत सीईटी सेलकडे मुदत वाढ करण्यासंदर्भात विविध विद्यार्थी संघटनांसह मागणी केली होती, व हि मागणी मान्य करण्यात आली. अशी प्रतिक्रिया स्टुडंट हेल्पिंग हँडस् संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी दिली आहे.

सीईटी सेलकडून अर्ज भरण्यास देण्यात आलेल्या मुदतवाढीचा महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

हे देखील वाचा :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT