हिंगोली - औंढा शहरामध्ये व्यावसायिक वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना मध्यरात्री दीड वाजता घडली आहे. एका चहाच्या टपरीला आग लागून त्यात असलेले गॅस सिलेंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. धक्कादायक म्हणजे देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या औंढानागनाथ मंदिराच्या परिसरातील भक्त निवास क्रमांक दोन जवळ या गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे.
हे देखील पहा -
सुदैवाने या ठिकाणी कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. गॅस सिलिंडरच्या या स्फोटाच्या आवाजाची तीव्रता एवढी होती की परिसरातील एक किलोमीटर पर्यंत नागरिकांना हा आवाज ऐकायला गेला. त्यामुळे अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
दरम्यान या घटेने मुळे औंढा नागनाथ मंदिर व्यवस्थापन व पोलिसांचा बेजबाबदारपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिर परिसरात अनधिकृत व्यावसायिक आपली दुकाने थाटून बसली आहेत. त्याच बरोबर मंदिर परिसरातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद आहेत. दरम्यान या घटने प्रकरणी औंढा पोलिसांनी नोंद केली असून अधिक तपास करत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.