Shree Mahalaxmi Ambabai  
महाराष्ट्र

अंबाबाईच्या दर्शनाचा ई- पास देण्यास प्रारंभ; काेल्हापूर सज्ज

Siddharth Latkar

श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात दर्शनास येणा-या भाविकांनी साडी, ओटी, नारळ, तेल किंवा पूजेचे कोणत्याही प्रकारचे साहित्य आणू नये. हे साहित्य मंदिर परिसरात नेण्यासाठी सक्त मनाई करण्यात आल्याचे प्रशासनाने नमूद केले.

काेल्हापूर : शारदीय नवरात्राेत्सावस उद्यापासून (गुरुवार) प्रारंभ हाेत आहे. राज्यातील धार्मिक स्थळांमध्ये उद्यापासूनच भाविकांना प्रवेश देण्याचा निर्णय नुकतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. त्यामुळे नवरात्राेत्सवाच्या पहिल्याच दिवशी काेल्हापूरच्या श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात Shree Mahalaxmi Ambabai Temple, Kolhapur अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी हाेऊ शकते असा अंदाज बांधून प्रशासनाने राज्यातील भाविकांना पुर्वनाेंदणी (ऑनलाईन बुकिंग) करुनच ई-पास प्राप्त झाल्यावर यावे असे आवाहन केले आहे. epass-mahalaxmi-kolhapur-navratri-festival-news-sml80

त्यासाठी प्रशासनाने आजपासून संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. संकेतस्थळावर जाऊन भाविकांनी त्यांची नाव नाेंदणी करणे आवश्यक आहे. ई -पास साठी भाविकांना आधारकार्ड क्रमांक, ई-मेल व मोबाईल क्रमांकाची माहिती संकेतस्थळावरील अर्जात भरणे अनिवार्य आहे. याबराेबरच नाेंदणी करणा-या सोबत त्याच अर्जात तिघांची नोंदणी करता येणे शक्य आहे.

नाेंदणी झाल्यानंतर मोबाईल आणि ई मेलद्वारे pdf स्वरूपात ई-पास क्यूआर कोडसह भाविकांना प्राप्त हाेईल. ई-पासचा आयडी क्रमांकचा संदेश मोबाईलवर येईल. भाविकांनी दर्शनासाठी येताना ई-पास किंवा ‘एसएमएस'द्वारे मिळालेला आयडी क्रमांक आणि आधारकार्ड साेबत असणे आवश्यक आहे.

सध्या ७ ते ९ ऑक्टोबरपर्यंत ई-पास काढता येणार आहे. त्यानंतरच्या दिवसांसाठी पुन्हा स्लाॅट दिले जाणार आहेत. नाेंदणी केलेल्या भाविकांना पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत अंबाबाईचे Mahalaxmi Ambabai Kolhapur दर्शन घेता येईल. त्यासाठी दर्शनाच्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी मंदिर परिसरात ई-पासच्या तपासणीसाठी यावे अशी सूचना करण्यात आली आहे.

दरम्यान श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या दर्शनाच्या ई पास काढण्यासाठी भाविकांनी येथे क्लिक करावे. हा ई पास काढताना १० वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला, आजारी व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नसल्याने भाविकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान श्री महालक्ष्मी अंबाबाई व जोतिबा दर्शनासाठी प्रशासनाने संकेतस्थळ उपलब्ध करुन दिले आहे. त्यानूसार महालक्ष्मी अंबाबाईचे दर्शनासाठी www.mahalaxmikolhapur.com आणि जाेतिबाच्या दर्शनासाठी www.shreejyotiba.com ही दाेन संकेतस्थळ उपलब्ध करुन दिली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT