Hasan Mushrif Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Hasan Mushrif News : राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ; घरावर ईडीकडून पुन्हा धाड

Political News : गेल्या दीड महिन्यापासून ईडीची ही दुसरी धाड आहे.

साम टिव्ही ब्युरो

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या घरावर आज पुन्हा एकदा ईडीने धाड टाकली आहे. गेल्या दीड महिन्यापासून ईडीची ही दुसरी धाड आहे. कागलच्या निवासस्थानी ED अधिकारी दाखल झाले आहेत. (Latest Political News)

किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ईडीचा ससेमिरा मुश्रीफांच्या पाठीशी लागला. मात्र कालच मुश्रीफांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. २४ मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे न्यायालयाचे ईडीला निर्देश देण्यात आले होते. मात्र तरी देखील आज ईडीने मुश्रीफांच्या घरावर धाड टाकली आहे.

हसन मुश्रीफ यांनी ५ मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. किरीट सोमय्या ईडीची कारवाई लावण्यात यावी असा हेतू साधत आरोप करत आहेत. सत्तेत आल्यापासून सातत्याने विरोधकांना लक्ष केलं जात आहे. त्यामुळे सोमय्या यांची चौकशी करण्यात यावी अशी याचिका हसन मुश्रीफ यांनी दाखल केली होती. तसेच सुरू असलेल्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये. यासह आरोपपत्रही दाखल करू नये याबाबत पोलिसांना निर्देश देण्याची मागणी देखील हसन मुश्रीफ यांनी केली होती.

शुक्रवारी (१० मार्च) रोजी यावर न्यायालयाने हसन मुश्रीफ यांना मोठा दिलासा दिला. २४ मार्चपर्यंत कारवाई न करण्याचे न्यायालयाने ईडीला निर्देश दिले आहेत. तसेच किरीट सोमय्या यांची देखील न्यायालयीन चौकशी करण्यात यावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश असूनही आज हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूरातील कागलच्या निवासस्थानी ED अधिकाऱ्यांनी धाड टाकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विद्युत पोलचा शॉक लागल्याने सात वर्षीय मुलाचा मृत्यू

Kalyan : कल्याणमध्ये खळबळ! अनधिकृत बांधकाम करणारा कुख्यात बिल्डर पोलिसांच्या ताब्यात, दोन वर्षांपासून होता फरार

Birds Masturbation: माणसाप्रमाणे पाळीव पक्षी करतात हस्तमैथुन, संशोधनातून आश्चर्यचकीत करणारी माहिती उघड

कोणतीही मेहनत न करता वजन होईल कमी! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' भन्नाट घरगुती उपाय

Monsoon Update : मान्सून कोकणात आला, पण राज्यभर पोहोचायला अडथळा; सरकारनं दिला महत्त्वाचा इशारा

SCROLL FOR NEXT