encroachment removed of khandbara railway station area  saam tv
महाराष्ट्र

Khandbara Railway Station : खांडबारा रेल्वे प्रशासनाने अतिक्रमित घर, दुकानांवर चालवला जेसीबी

Nandurbar News : रेल्वे पोलिस आणि विसरवाडी पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे यांचे मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलिसांनी घटनास्थळी माेठा पाेलिस बंदोबस्त ठेवला होता.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

नवापूर (navapur) तालुक्यातील खांडबारा येथील रेल्वे स्थानक (khandbara railway station) जवळ असलेला रेल्वे जागेतील अतिक्रमणांवर (encroachment) रेल्वे प्रशासनाने कारवाई केली. या ठिकाणची अतिक्रमित घरे, दुकाने जमीनदाेस्त केली. यावेळी स्थानिकांनी तीव्र विराेध केला. त्यामुळे काही काळ गाेंधळ निर्माण झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

खांडबारा येथील रेल्वे स्थानक जवळ असलेल्या अतिक्रमित मालमत्तांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाशी ग्रामस्थांनी हु्ज्जत घातली. त्यामुळे घटनास्थळी दाेन्हीकडून वादावादी सुरु झाली. यावेळी प्रशासनाने ग्रामस्थांना कायदेशिर प्रक्रियेत अडथळा आणू नये अन्यथा ठाेस कारवाई करु असा इशारा दिला.

रेल्वे प्रशासनाने दोन जेसीबीच्या साह्याने या ठिकाणी अतिक्रमित अनेक दुकाने व घर जमीनदोस्त केली. घटनास्थळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलीसांनी माेठा बंदोबस्त ठेवला हाेता. तसेच विसरवाडी पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांचे मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीसांचा देखील बंदोबस्त होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Purandar Fort : पुण्याजवळील ऐतिहासिक पुरंदर किल्ला, 'या' गोष्टी वाचून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल

महिनाभर रोज न चुकता करा योगा, शरीरात होतील आश्चर्यकारक 5 बदल

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

SCROLL FOR NEXT