encroachment removed in mahabaleshwar panchgani and bhilar saam tv
महाराष्ट्र

Mahabaleshwar Encroachment : साम टीव्हीच्या बातमीचा दणका, महाबळेश्वरसह भिलारमधील अनधिकृत बांधकामांवर हाताेडा

ज्या भागात कारवाई सुरु आहे तेथे माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात आला.

ओंकार कदम

Mahabaleshwar News :

थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीत आज (शनिवार) सकाळच्या प्रहरी जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणांवर जेसीबी चालविण्यास प्रारंभ केला आहे. या भागात माेठा पाेलिस बंदाेबस्त तैनात आहे. यापूर्वी देखील या भागातील अतिक्रमणांवर प्रशासानाने हाताडाे मारला हाेता. (Maharashtra News)

महाबळेश्वर, पाचगणी आणि भिलार या परिसरामध्ये असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासन कारवाई करीत आहे. विशेषत: खिंगर, भोसे, भिलार गावातील अनधिकृत बांधकामे एकाच वेळी पोकलेन, जेसीबीने पाडण्यास प्रारंभ केला आहे.

साम टीव्हीने महत्त्वाच्या प्रश्नावर वाचा फाेडली

पाचगणी प्रमाणेच महाबळेश्वर, भिलार या डोंगर उतारावर असणाऱ्या गावांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात डोंगर उतारावर बांधकामे झाली आहेत. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा उत्तराखंडमधील जोशीमठ सारखीच स्थिती राज्यातील पाचगणी, महाबळेश्वर येथे निर्माण होऊ शकते, अशी भीती तज्ज्ञांनी साम टीव्हीशी बाेलताना यापूर्वी व्यक्त केली हाेती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान साम टीव्हीच्या वृत्ताची दखल घेत आज जिल्हा प्रशासनाने कारवाईस प्रारंभ केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

Maharashtra Live News Update: दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT