Elephant In Kolhapur Saam Digital
महाराष्ट्र

Elephant In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात हत्तींचा धुमाकूळ, मानवी वस्ती, पाणवठ्यांवर वावर, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण

Elephant In Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. मानवी वस्ती आणि पाण्याच्या ठिकाणी हत्ती तळ ठोकून बसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Elephant In Kolhapur

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. मानवी वस्ती आणि पाण्याच्या ठिकाणी हत्ती तळ ठोकून बसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पीके काढणीला आली आहेत. मात्र, हातातोंडाशी आलेल्या पिकांचा हत्तींनी अक्षरश:फडशा पाडल्यामुळे शेतकरीही हवालदिल झाला आहे. वन विभाग आणि शेतकरी हत्तींना जंगलाच्या दिशेने हुसकावून लावतात मात्र काही वेळातच हत्ती पुन्हा शेती आणि मानवी वस्तीत दाखल होत आहेत, त्यामुळे या हत्तींचा बदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून हाजगोळी, नगरगाव, धामणे परिसरात हत्तीचा वावर आहे. बुधवारी रात्री हत्तीनं जंगमहट्टी, कलिवडे भागातील ऊस, भात आणि नाचणी पिकांचं मोठं नुकसान केलं. एकीकडं आंदोलनामुळं ऊस तोडणी होत नाहीय, तर दुसरीकडं हत्तीकडून ऊसाचा फडशा पाडला जात असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे या परिसरातील ऊस उचल तातडीने करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी धरण परिसरात हत्ती तळ ठोकून आहे. बुधवारी रात्री अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस, भात आणि नाचणी पिकाचं मोठं नुकसान केलं. त्यामुळं शेतकरी हैराण झाला आहे. वनविभाग पंचनाम्यापलिकडे काही करत नाही. त्यामुळं चंदगड परिसरात उसाची उचल लवकर करावी, यासाठी प्रशासनानं साखर कारखान्यांना सूचना करावी, अशी मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे.

चंदगड तालुक्यात दरवर्षी कर्नाटकातील हत्तीचा वावर असतो. त्यांना हुसकावून लावलं तरी पुन्हा पुन्हा ते येतात. त्यामुळे चंदगडमधील शेतकरी वर्ग धास्तावला आहे. रात्रीच्या वेळेला वन विभाग आणि शेतकरी हत्ती ऊस फडात असताना फटाके फोडून जंगलच्या दिशेने हुसकावून लागतात. मात्र, पुन्हा हत्ती मानवी वस्ती तसंच शेतात तळ ठोकून असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT