चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक बाईक जळून खाक !  सागर गायकवाड
महाराष्ट्र

चार्जिंगला लावलेली इलेक्ट्रिक बाईक जळून खाक !

तुम्ही जर इलेक्ट्रिक बाईक वापरत असाल तर हि बातमी नक्कीच वाचा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सागर गायकवाड

नाशिक : तुम्ही जर इलेक्ट्रिक बाईक वापरात असाल तर सावधान ! नाशिकच्या इंदिरानगर परिसरात असलेल्या पांडवनगरी येथील ऐश्वर्या रेसिडेन्सी या इमारतीमध्ये इलेक्ट्रिक बाईकला अचानक आग लागून संपूर्ण बाईक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी या बाईकचे मोठे नुकसान झाले आहे. Electric Bike Burnt In Nashik

हे देखील पहा -

ऐश्वर्या रेसिडेन्सी मध्ये राहणाऱ्या या बाईकच्या मालकाने आपली इलेक्ट्रिक बाईक इमारतीच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावली होती. चार्जिंगला लावल्यानंतर गाडीची बॅटरी ओवरहीट झाल्याने अचानक त्या बाईकला आग लागली. आग एवढी भयानक होती की या आगीच्या ज्वाळा परिसरात लांबून दिसत होत्या. परिसरातील नागरिकांना ही आग दिसल्यानंतर त्यांनी वाळू आणि माती च्या साह्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तब्बल एक ते दीड तासाने ही आग विझली या आगीमुळे या इमारतीतील मीटर आणि वायरिंग पूर्णपणे जळून खाक झाली आहे

इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक कार यांना आरटीओकडून तपासणी झाल्यानंतरच त्यांना बाजारात विक्रीस परवानगी दिली जाते..त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र ओव्हर चार्जिंग किंवा चार्जर हे त्याच कंपनीचे न वापरता दुसऱ्या कंपनीचे वापरल्यामुळे देखील बाईक किंवा कारची बॅटरी ओव्हरहीट होऊ शकते आणि यात असाच प्रकार घडला असावा असं तज्ज्ञांचं मत आहे.

पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव गगनाला भिडत असताना नागरिक हे इलेक्ट्रिक गाडीच्या बाजूने वळत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाडीची मागणी वाढली आहे. पण गाडी घेतल्यानंतर ती कशा पद्धतीने वापरावे याचे ज्ञान असणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुठलीही इलेक्ट्रिक गाडी घेताना त्यासंबंधी पूर्ण माहिती घेऊन खरेदी करावी.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Munde Case : व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरण; पोलिसांनी नोंदविला बाळा बांगरचा जवाब, ६ तास कसून चौकशी

Electric Scooter: तीन लोकांसाठी योग्य आहे का इलेक्ट्रिक स्कूटर? जाणून घ्या स्कूटरची वजन क्षमता आणि परफॉर्मन्स

Kidney infection symptoms: किडनीमध्ये इनफेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'ही लक्षणं; खराब होण्यापूर्वी डॉक्टरांना भेटा

Maharashtra Live News Update: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव

Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..

SCROLL FOR NEXT