Voting x
महाराष्ट्र

मोठी बातमी! आज आचारसंहिता लागणार, २९ महापालिका निवडणुकीची घोषणा होणार

Maharashtra Election Commission Todays PC Live Update : राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाची दुपारी ४ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra 29 municipal corporation elections Date update : मुंबई, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आज दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. आयोगाकडून निवडणुकीची घोषणा केल्यानंतर त्याचक्षणापासून राज्यात आचारसंहिता जाहीर होणार आहे. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबाबतही आयोगाकडून माहिती दिली जाऊ शकते. (Maharashtra 29 municipal corporation elections date update)

कोणत्या २९ महापालिकेची निवडणूक होणार? संपूर्ण यादी

अहिल्यानगर महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

अमरावती महानगरपालिका

भिवंडी निजामपूर महानगरपालिका

बृहन्मुंबई महानगरपालिका

चंद्रपूर महानगरपालिका

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका

धुळे महानगरपालिका

इचलकरंजी महानगरपालिका

जळगाव महानगरपालिका

जालना महानगरपालिका

कल्याण डोंबिवली महानगरपालिका

कोल्हापूर महानगरपालिका

लातूर महानगरपालिका

मालेगाव महानगरपालिका

मीरा भाईंदर महानगरपालिका

नागपूर महानगरपालिका

नांदेड वाघाळा महानगरपालिका

नाशिक महानगरपालिका

नवी मुंबई महानगरपालिका

पनवेल महानगरपालिका

परभणी महानगरपालिका

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका

सोलापूर महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

उल्हासनगर महानगरपालिका

वसई विरार महानगरपालिका

मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा आज होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील प्रलंबित असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, असे सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जर आज आयोगाने घोषणा केली तर आजपासूनच राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. महापालिका निवडणुकांच्या तारखांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT