Akola Latest Crime News Saam TV
महाराष्ट्र

Crime News: खळबळजनक! कबूतर सोडून दिल्याने मोठ्या भावाला राग अनावर; ७ वर्षीय भावाची हत्या, मृतदेह विहिरीत फेकला

Akola Crime News: अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना अकोला जिल्ह्यातील पिंजर गावात घडली. शेख अफ्फान शेख अय्युब (वय ७ वर्ष) असं हत्या झालेल्या लहान भावाचे नाव आहे.

Satish Daud

Akola Latest Crime News

पोत बांधून पकडलेले कबूतर लहान भावाने सोडून दिल्याने मोठ्या भावाला राग अनावर झाला. त्याने रागाच्या भरात लहान भावाला मारहाण केली. इतकंच नाही, तर त्याचा गळा आवळून खून देखील केला. हत्येनंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला.

याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना अकोला जिल्ह्यातील पिंजर गावात घडली. शेख अफ्फान शेख अय्युब (वय ७ वर्ष) असं हत्या झालेल्या लहान भावाचे नाव आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंजर गावात राहणारा ७ वर्षीय शेख अफ्फान हा १९ डिसेंबरला अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी त्याची शोधाशोध घेतली.

मात्र, अफ्फानचा थागपत्ता लागला नाही. अखेर त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अफ्फान याचा शोध घेतला असता, तब्बल १३ दिवसांनी त्याचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. अफ्फानची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता.

याप्रकरणी पोलिसांनी (Police) तातडीने तपासाची चक्रे फिरवत अफ्फारच्या १७ वर्षीय चुलत भावाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, आपण अफ्फानची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांत दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफ्फान आणि त्याचा १७ वर्षीय चुलत भाऊ १९ डिसेंबर रोजी कबुतर पकडण्यासाठी गेले होते.

दोघांनी पोत बांधून कबुतरांना जाळ्यात अडकवले. मात्र, अफ्फान याने पोतमधील कबुतर सोडून दिले. याचाच राग मनात धरुन १७ वर्षीय भावाने त्याची गळा आवळून हत्या (Crime News) केली. हत्येनंतर त्याने मृतदेह जवळच्या विहिरीत फेकून दिला. अफ्फान माझ्यासोबत नव्हताच असा बनाव १७ वर्षीय भावाने रचला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT