Eknath Shinde reviewing ministers’ performance ahead of political reshuffle. Saam Tv
महाराष्ट्र

एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार; 3 ते 4 मंत्र्यांना मिळणार डच्चू? ही नावं चर्चेत

Eknath Shinde Minister Reshuffle 2026: एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीवरून मोठा फेरबदल करणार आहेत. निवडणुकीतील यश-अपयश लक्षात घेऊन काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असून नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

Omkar Sonawane

मुंबई: राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभा निवडणुकीपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश-अपयश लक्षात घेऊन पक्षात मोठे फेरबदल करणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रा वगळता इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकीमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळेच एकनाथ शिंदे यांनी 2 ते 4 मंत्र्यांचे कान टोचले असून लवकरच त्या मंत्र्यांना डच्चू मिळणार असून त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत एकनाथ शिंदे असल्याचे कळत आहे.

निवडणुकीत झालेला जय-पराजय लक्षात घेऊन शिवसेनेच्या सर्व जिल्हासंपर्क प्रमुख, नेते आणि सचिवांना संघटना बांधणीसाठी गावोगावी जाऊन आढावा घेण्याच्या सूचना दिलेल्या आहे. निवडणुकीमध्ये अपेक्षित का यश का मिळाले नाही, कुठे कमी पडलो या सगळ्याची माहिती घ्यायला एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना संकेत दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणूक आणि पालिका निवडणूक ही शिंदे गटाच्या मंत्र्यांसाठी प्रतिष्ठेची होती.

त्यामुळे फक्त ताफा घेऊन फिरणाऱ्या मंत्र्यांना पक्षाची जबाबदारी दिली जाणार आणि नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता कोणाला डच्चू मिळणार आणि कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

महापालिकेत मोठे अपयश

महापालिकेत निवडणुकीत ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिंदे गटाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे जबाबदारी सोपवलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीची गंभीर दखल घेत, शिंदे पक्षातील अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार सदा सरवणकर यांची मुलं, खासदार रविंद्र वायकर यांची मुलगी, राहुल शेवाळे यांची भावजय, आमदार अशोक पाटील, मंगेश कुडाळकर यांच्या मुलांना पराभव पत्करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्याच्या खेड तालुक्यातील गुळाणी घाटात खाजगी शाळेची बस आणि डंपरचा समोरचा धडक

Accident News : भरधाव कारने ६ जणांना चिरडलं, चिमुकल्याचा जागीच मृत्यू; ५ गंभीर जखमी, अपघाताचा थरारक VIDEO

Trendy Blouse Design: कोणत्याही साडीवर परफेक्ट आहेत हे ७ ट्रेंडी ब्लाऊज; लग्न आणि पार्टीमध्ये दिसाल ग्लॅमरस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची टेन्शन वाढवणारी बातमी! ₹१५०० बंद होण्याची शक्यता; कोणाला बसणार फटका?

Ranveer Singh Death Threats: रणवीर सिंग आणि रोहित शेट्टीला पुन्हा धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गुंडाचे नाव समोर

SCROLL FOR NEXT