SHIV SENA GETS MAJOR BOOST IN NANDED; LEADERS JOIN EKANATH SHINDE CAMP saam tv
महाराष्ट्र

‘शिवसेना कोणाची?’ सुनावणी सुरू असतानाच शिंदेसेनेला मोठं बळ; बड्या नेत्याचा पक्षप्रवेश

Eknath Shinde Shiv Sena Nanded Party Entry Latest Political News: ‘शिवसेना कोणाची?’ सुनावणी सुरू असतानाच नांदेडमध्ये शिंदेसेनेला मोठे बळ मिळाले आहे. शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वात विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

Omkar Sonawane

नांदेड जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटनविस्ताराला आणखी बळ मिळाले असून, शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील नंदनवन बंगल्यावर झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना त्यांच्या पाठीशी शिवसेना आणि आपण स्वतः ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. नाळेश्वर, राहटी आणि पिंपळगाव (कोरका) यांसह नांदेड जिल्ह्यातील विविध भागांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

नाळेश्वर येथील माजी जिल्हा परिषद सभापती नरहरी ठाकराम वाघ, माजी सरपंच रुपेश केशवराव वाघ, ग्रामपंचायत सदस्य बालाजी व्यंकटी इंगोले, ग्रामपंचायत सदस्य बालाजी दत्ता भारती, शालेय व्यवस्थापन समितीचे बळीराम उत्तम वाघ यांचा प्रवेश करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. राहटी येथील भोजराज वामनराव बोकारे, रावसाहेब नागोराव बोकारे, गोविंद पुंडलिक बोकारे, भागवत एकनाथ बोकारे, लक्ष्मण भानुदास बोकारे आणि रतन संभाजी बोकारे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. तसेच पिंपळगाव (कोरका) येथील नागेश व्यंकटराव बडवणे, जि. प. सदस्य बाळगीर खुशालगिरी गिरी महाराज, दत्तरामजी गणेशराव बडवणे, बालाजीराव माधवराव डुकरे, रावसाहेब दत्तरामजी सूर्यवंशी आणि गोविंदराव रावण जाधव यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. या पक्षप्रवेशासाठी संपर्क प्रमुख रमाकांत मढवी यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही समन्वय साधला.

पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना शिंदे यांनी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तुम्ही सर्व कार्यकर्ते आलात. तुमच्या पाठीशी बालाजी कल्याणकर स्वतः आहेतच; पण बालाजी कल्याणकर यांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आहे. सगळ्यांच्या पाठीशी मी स्वतः आहे, शिवसेना आहे, असे शिंदे म्हणाले. कल्याणकर यांच्या मतदारसंघात विकासकामे झाली, जनतेला न्याय मिळाला आणि लोकांचे प्रश्न सोडवले गेले. त्यामुळेच मतदारसंघातील जनतेने त्यांना पुन्हा निवडून दिले, असे सांगत शिंदे यांनी कल्याणकर यांच्या कामाचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंचा Dominos ला मोठा दणका! 3 आउटलेटचे परवाने निलंबित; मोठी खळबळ

Hot Chocolate Recipe: घरच्या घरी बनवा कॅफेसारखं क्रीमी आणि टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update : पुण्यात आणखी एक ठिकाणी कारने घेतला पेट

Gen z ना गटर जनरेशन म्हणणं कंगना रणौतना भोवणार? भाजप खासदार सापडल्या कायद्याच्या कचाट्यात, VIDEO

२४ तासांत ७ वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची बदली, देशात खळबळ

SCROLL FOR NEXT