eknath shinde press conference Live updates  eknath shinde press conference Live updates
महाराष्ट्र

Eknath Shinde PC Live : केंद्रात जाणार की राज्यातच थांबणार? शिंदेंनी झटक्यात विषय संपवला, म्हणाले...

Eknath Shinde Press Conference Live Updates : एकनाथ शिंदे केंद्रात जाणार, राज्याच्या सत्तेत ते सहभागी होणार नाही, या चर्चेवर शिंदेंनी उत्तर दिलेय. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे...

Namdeo Kumbhar

Eknath Shinde Press Conference LIVE : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण? भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाबाबात दावा करण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. एकनाथ शिंदेंना केंद्रात जाण्याची ऑफर दिल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. या सर्व घडामोडीवर एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलेय. केंद्रात जाणार की राज्यातच राहणार, या प्रश्नाचं उत्तर देताना शिंदे म्हणाले की, "दिल्लीला उद्या आमची बैठक आहे. अमित शहांसमोर तिन्ही पक्षांची बैठक आहे. त्याच्यासमोर चर्चा होईल. त्यात निर्णय होईल." (Maharashtra Government Formation)

महाराष्ट्राचं जनतेचं प्रेम मिळालं. ते आतापर्यंत कुणाला मिळालं नाही. सख्खा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली. हे कमी नाही. मी ज्या काही योजना आणल्या. त्या मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतले, ते त्यांना माहीत आहेत. त्यांचा हा मोठेपणा आहे, असे एकनाथ शिंदेंनी सांगितले.

३ दिवस एकनाथ शिंदे होते कुठे? काय म्हणाले शिंदे

मी वर्षा निवासस्थानीच होतो. सगळ्यांना भेटत होतो.

मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला आहे का?

मलापण अडीच वर्षे पाठिंबा दिला ना? आता महायुतीचा मुख्यमंत्री होतोय. त्यांच्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आता त्यांचा निर्णय आहे. महायुतीचा जो असेल त्याला पाठिंबा देण्यासाठी बसलोय, असे एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यात की केंद्रात? काय म्हणाले एकनाथ शिंदे

आता आम्हाला चांगलं महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे. महायुती मजबुतीने काम करणार आहे. उद्या आमची दिल्लीला अमित शहांसमोर बैठक होणार आहे. तिन्ही पक्षांची बैठक असेल, त्यांच्यासमोर चर्चा होईल. त्यात निर्णय होईल.

मी काल मोदी, शाह यांच्याशी फोनवर बोललो. सरकार स्थापन करण्यात कुठलाही अडथळा नाही. जो वरिष्ठ निर्णय घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. उद्या अमित शहांसोबत बैठक आहे. त्यात जी चर्चा होईल, निर्णय होईल.

काल मोदींना मी सांगितलं आहे की, जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या. एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहे. मोदींना आणि अमित शहांनाही हेच सांगितलं.

ईव्हीएम घोटाळा आरोप

झारखंडमध्ये ईव्हीएम बरोबर, लोकसभेत, कर्नाटकात.. बरोबर होता. हरल्यावर रडीचा डाव कशाला खेळता, असा सवाल एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

SCROLL FOR NEXT