Eknath Shinde on Nawab Malik Saam TV
महाराष्ट्र

Eknath Shinde on Nawab Malik : नवाब मलिक कुणासोबत जातील, शरद पवार की अजित पवार? एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

Political News : नवाब मलिक हे बाहेर आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे.

संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव

Jalgaon News : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिकांची सुटका झाल्यानंतर ते अजित पवारांसोबत जाणार की शरद पवारांसोबत राहणार, असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. नवाब मलिक हे शरद पवारांसोबतच, मात्र त्यांचा व्यक्तिगत निर्णय असेल, असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

नवाब मलिक हे बाहेर आल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, भाजप एक मशीन आहे. त्यात व्यक्ती टाकला की तो स्वच्छ आणि क्लीन होऊन बाहेर येतो, त्यानंतर मंत्री होतो, एकनाथ खडसे यांनी म्हटलं. (Latest marathi News)

भाजपाच्या विरोधात बोलेल त्याला ईडी लावली जाते. निवडणूक असली की ED कारवाई सुरू होते. सरकारच्या षडयंत्राचा मी अनुभव घेतलाय. माझ्यावर सुद्धा ED ची कारवाई झाली होती. माझ्या जावयावरही कारवाई केली होती. असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं.  (Political News)

भ्रष्ट लोकांवर आरोप करायचे आणि त्यांना आपल्यासोबत घ्यायचं. विरोधक संपवण्याच्या उद्देशाना ईडीचा वापर केला जात आहे, असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

SCROLL FOR NEXT