Eknath shinde News  Saam tv
महाराष्ट्र

Video : मुख्यमंत्र्यांकडून जाहिरातींसाठी सरकारी तिजोरीतून 'इतक्या' कोटींची उधळपट्टी; RTI मधून धक्कादायक माहिती उघड

मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या तिजोरीतून दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे

Rashmi Puranik

Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती उघड झाली आहे, अशी माहिती ही माहिती अधिकारातून उघड झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी शासनाच्या तिजोरीतून दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये खर्च केल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे, असा दावा आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी केला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरटीआय कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी माहिती अधिकारातून ही माहिती समोर आणली आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यात त्यांचे सरकार स्थापन झाल्यापासू फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती ही माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे.

जाहिरातींचे राज्य शासनाकडून हे देयके उपलब्ध झाले आहेत. यात धक्कादायक माहिती अशी की, खर्चाची सरासरी काढली तरी दिवसाला १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातला शासकीय पैशांची वारेमाप उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे, असे आरटीआय (RTI) कार्यकर्ते नितीन यादव यांनी सांगितले.

'सर्वसामन्याच्या खिशातून शासनास जाणाऱ्या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल का, जाहिरातबाज सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का, असा प्रश्न आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Rankings: ICC टेस्ट रँकिंगमध्येही सिराज-जडेजाचा कहर; नंबर 1 ताजही बुमराहकडे कायम, 'या' फलंदाजाचं मोठं नुकसान

Sachin Pilgaonkar: 'मी उर्दूसोबत झोपतो, रात्री ३ वाजता उठवलं तरीही उर्दूमध्येच...; सचिन पिळगांवकरांचे पुन्हा एक वकव्य चर्चेत

Retirement Planning: EPF, NPS की PPF; कोणत्या योजनेत मिळणार सर्वाधिक परतावा? कॅल्क्युलेशन वाचा

Maharashtra Live News Update : पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात

Gautami Patil : अडकवण्याचा प्रयत्न, १९-२० लाख रुपयांची मागणी; अपघात प्रकरणावर गौतमी पाटील नेमकं काय बोलली?

SCROLL FOR NEXT