Pandharpur Wari 2022 Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

शिंदेंच्या ४ पिढ्यांनी केली पांडूरंगाची पूजा; संभाजी ते रुद्रांश शिंदेंकडून शासकीय महापूजा

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते झाली .

साम टिव्ही ब्युरो

संदीप भुजबळ

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात (Pandharpur) विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. पूजा करताना मंदिराचा गाभारा विठुमाउलीच्या जयघोषात दुमदुमून गेला. यंदा मानाचे वारकरी म्हणून बीड येथील नवले दाम्पत्यांना मान मिळाला. तसेच आज एकनाथ शिंदे यांच्या नावार अनोखा विक्रम नोंद झाला आहे, शिंदे कुटुंबातील चार पिढ्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा झाली. एकनाथ शिंदेंसोबत त्यांचे वडिल संभाजी शिंदे, मुलगा खा. श्रीकांत शिंदे आणि संभाजी शिंदेंचा पणतू , मुख्यमंत्र्यांचा नातू रुद्रांश शिंदे यांनी सहभाग नोंदवत शिंदेंच्या ४ पिढ्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. (Ashadhi Ekadashi 2022 News In Marathi)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे ४ पिढ्यांनी दर्शन घेतलेले बहुधा पहिले मुख्यमंत्री असावेत. आज पहाटे विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा पार पडली. भाविकांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण होते. शिंदे कुटुंबाचे नातेवाईकही यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा लहान नातू होता. यावेळी शिंदे गटातील आमदारही उपस्थित होते.

Eknath Shinde

आषाढी वारीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री म्हणून कोण करणार याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर मुख्यमंत्री म्हणून आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा झाली. ऑटो ड्रायव्हर, आनंद दिघेंचे मानसपुत्र ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, असा त्यांचा प्रवास खडतर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनतीमुळे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.

Eknath Shinde

एकनाथ शिंदे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. ते सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दरे गावातील आहेत. पण, त्यांची कर्मभूमी ठाणे राहिली. प्रारंभीच्या काळात त्यांनी ऑटो ड्रायव्हर म्हणून काम केले. शिवसेनेचे ताकदवान नेते आनंद दिघे यांच्यापासून प्रेरणा घेत त्यांनी शिवसेनेत काम सुरू केले. शाखा प्रमुखापासून ते आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यांचे सातारा जिल्ह्यातील दरे या गावात आजही त्यांची शेती आहे. ते आजही गावी जावून शेती करतात. आज त्यांच्या चारही पिढ्यांनी पहाटे विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा केली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

SCROLL FOR NEXT