Maharashtra Education System Under Review; Shinde Directs Focus on School Facilities 
महाराष्ट्र

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

Eknath Shinde Meeting With Education Minister Dada Bhuse : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादा भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शालेय शिक्षणाचा आढावा घेतला. सरकारी शाळांच्या सुविधा आणि स्थिती सुधारण्यावर भर दिलाय

Bharat Jadhav

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील 'नंदनवन' बंगल्यावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत राज्याच्या शिक्षण क्षेत्राचा सविस्तर आढावा बैठक घेतली. चार तास चाललेल्या या बैठकीत राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला. शाळा सुधार मोहिमेतून कॉक्रोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके राज्यातील झेडपी शाळांमधील दयनीय स्थिती जगासमोर आणत आहेत.

सरकारी शाळांमधील अपुऱ्या सुविधांमुळे विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होत आहे. सरकारी शाळांची कशी अवस्था झाली आहे, याची पोलखोल सीजेपीकडून करण्यात येत आहे. अभिजीत दीपकेंच्या स्कूल ठीक करो मोहिमेचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहेत. अभिजीत दीपकेंनी राज्यातील शाळांची स्थिती चव्हाट्यावर आणल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडवर आले आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदेंनी आज नंदनवन बंगल्यामध्ये बैठक घेत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचा क्लास घेतला. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत 'नंदनवन' बंगल्यावर तब्बल चार तास चाललेली एक मॅरेथॉन बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा शिंदे यांनी घेतला.

'कॉकरोच जनता पार्टी'चे (CJP) प्रमुख अभिजित दीपके यांनी सरकारी शाळांना दिलेल्या भेटींचा परिणाम दिसून येऊ लागला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आपल्या 'नंदनवन' या निवासस्थानी बैठक घेतली. सलग चार तास चाललेल्या बैठकीत राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, शिक्षण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या आतापर्यंतच्या प्रगतीचाही शिंदे यांनी आढावा घेतला.

शिंदेंनी मंत्री भुसे यांना काय सांगितले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे यांनी मंत्री भुसे यांना राज्यातील शाळांची स्थिती आणि विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधांकडे बारकाईने लक्ष देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. तसेच, कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

शिंदे यांनी शिक्षण विभागाला 'मिशन मोड'वर काम करण्याचे आणि राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत व विद्यार्थ्यापर्यंत लाभ पोहोचतील याची खात्री करण्याचे निर्देश दिलेत. राज्यातील शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्यासाठी एक सर्वसमावेशक व कालमर्यादित कृती आराखडा तयार केला जावा, असेही उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केलेत.

शिक्षण व्यवस्था सुधारण्याबाबत निर्देश

राज्याची शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचा सहभाग घ्यावा, असे निर्देशही शिंदे यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी, पोषण, 'मध्यान्ह भोजन' (Mid-Day Meal) योजनेचा आढावा आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित उपक्रम यांवर विशेष भर देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

खासदार आणि आमदार शाळा दत्तक घेणार

राज्यातील खासदार आणि आमदारांना त्यांच्या संबंधित मतदारसंघांमधील शाळा दत्तक घेण्यास आणि त्यांच्या विकासात योगदान देण्यास प्रोत्साहित केले जाईल, असे शिंदे यांनी बैठकीनंतर सांगितले. उपलब्ध निधी आणि स्थानिक संसाधनांचा वापर करून शाळांच्या विकासाला गती देण्याचे प्रयत्न केले जातील. लोकप्रतिनिधी, पालक आणि स्थानिक रहिवासी यांच्या सहभागातून शाळांचा विकास अधिक वेगाने साधता येईल, असेही त्यांनी नमूद केलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

90 मतदारसंघांत मतदार धोक्यात? 25 टक्के मतदारांची SIR कडे पाठ

SCROLL FOR NEXT