भरत नागणे, साम टीव्ही
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ते रस्ते मार्गाने पुण्याकडे रवाना झाले. हेलिकॉप्टर उड्डाण घेण्याच्या तयारीत असनातच पायलटच्या लक्षात हा बिघाड आल्याने संभाव्य दुर्घटना टळली. हेलिकॉप्टरच्या बॅटरीमध्ये बिघाड असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने प्रवास करण्याऐवजी रस्ते मार्गे पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे हे आज कार्तिकी वारीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सुमारे दोन ते तीस पंढरपूरमध्ये विविध ठिकाणांची पाहणी केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन तयारीचा आढावा घेतला.
त्यानंतर मुंबईकडे रवाना होण्यासाठी ते हेलिकॉप्टर बसले. मात्र, सव्वाचारच्या सुमारास हेलिकॉप्टर उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानच पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे लक्षात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत हेलिकॉप्टरच्या बॅटरीमध्ये बिघाड असल्याचे समोर आले.
पंढरपूरमध्ये अशा प्रकारच्या बॅटरीची दुरुस्ती करण्याची व्यवस्था नसल्याने जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, आमदार अभिजीत पाटील, आमदार जानकर आणि आमदार खरे यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरने प्रवास न करता वाहनाने पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
दरम्यान याआधीही अनेक राजकीय नेत्यांच्या हेलिकॉप्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही वेळा अशा घटनांमुळे नेत्यांना आपला दौरा बदलावा लागला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमधील बिघाड उड्डाणपूर्वीच पायलटच्या लक्षात आल्याने खबरदारी म्हणून पुढील प्रवासाचा मार्ग बदलला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.