बीड : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बीड जिल्ह्यात शिंदे गटाचे पुन्हा वर्चस्व पाहायला मिळाले आहे. बीड तालुक्यातील तीन पैकी दोन ग्रामपंचायतींवर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा भगवा फडकला आहे. एक ग्रामपंचायत (gram panchayat) उध्दव ठाकरेंच्या सेनेनी कायम राखली आहे. राज्यातील राजकारणात शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने आलेले असताना बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील शिंदे गटाचे वर्चस्व आणि करिष्मा दिसून आला आहे. तसे दावे शिंदे गटाकडून देखखील केले जात आहेत. (Gram Panchayat Election Result 2022)
बीड तालुक्यातील अंथरवनपिंपरी आणि पिंपरीतांडा या ग्रामपंचायतीत अटीतटीची निवडणूक झाली यामध्ये शिंदे गटाने बाजी मारत दोन्ही ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवला आहे. तसेच बीड तालुक्यातील गवळवाडी ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे सेनेने विक्रमी विजय मिळवला आहे. यात दोन्ही गटाकडून ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात विजयाचे दावे केले आहेत. (Beed Latest Marathi News)
शिवसेनेचा आजही करिष्मा
उद्धव ठाकरे सेनेच्या वतीने शिवसेनेमधून कोणी निघून गेले असले तरी देखील शिवसेनेचा करिष्मा ग्रामीण भागामध्ये कायम आहे व निष्ठेचे शिवसैनिक कुठेही गेले नाहीत. हेच या विजयातून दिसून येते असे नवनिर्वाचित ग्रामपंचायतचे सदस्य गणेश मस्के यांनी सांगितले. (Uddhav Thackeray News)
दाेन ग्रामपंचायती आमच्या ताब्यात
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने ग्रामीण भागामध्ये आता नव्या विकासाची सुरुवात होत असून या अनुषंगाने जनतेने आम्हाला कौल दिला आहे. त्यामुळे बीड तालुक्यातील दोन ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आल्या आहेत असा दावा शिवसेनेच्या शिंदे गटातील राहुल घोडके यांना केला आहे. (Eknath Shinde News)
बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल
भाजप 4
राष्ट्रवादी 4
शिंदे गट 2
शिवसेना 1
अपक्ष 1
भाजप- राष्ट्रवादी युती 1
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.