Eknath Khadse / @EknathGKhadse SAAM TV
महाराष्ट्र

Eknath Khadse Health Update : लवकरच सेवेत रूजू होईल...; एकनाथ खडसेंची हॉस्पिटलमधून पोस्ट

Eknath Khadse : हृदयविकाराच्या झटक्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले एकनाथ खडसे यांनी प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.

Nandkumar Joshi

Eknath Khadse Health Update From Bombay Hospital :

हृदयविकाराच्या झटक्यानंतर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असून, लवकरच सेवेत रुजू होईल, असे त्यांनी समर्थकांना आणि हितचिंतकांना सांगितले.

एकनाथ खडसेंना रविवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने जळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुढील उपचारांसाठी त्यांना एअर अॅम्ब्युलन्समधून मुंबईत आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांनी आपल्या प्रकृतीविषयी हॉस्पिटलमधूनच माहिती दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एकनाथ खडसे यांच्या एक्स अकाउंटवरून प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. ''मध्यंतरी मला हृदयविकाराचा त्रास झाला. मात्र आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझी तब्येत आता चांगली आहे. लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल,' असं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

प्रसंग कोणताही असो, आपण माझ्या पाठिशी उभे राहता. आपले हेच सदिच्छांचे पाठबळ मला अधिक जोमाने काम करण्यासाठी बळ देते. आपणा सर्वांचे मन:पूर्वक धन्यवाद ! महाराष्ट्रातील सर्व नागरिक बंधू-भगिनींना दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शरद पवार यांनी घेतली होती भेट

एकनाथ खडसे यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीबाबत विचारपूस केली. तब्येतीची काळजी घ्यावी, असेही त्यांनी खडसेंना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT