Government Jobs : सरकारी नोकरभरतीची वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तरुणाईच्या रेट्यामुळे राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने (Government) नोकरभरतीवरील (Jobs) निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय सोमवारी (३१ ऑक्टोबर) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील विविध विभागातील ७५ हजार पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. (Government Jobs News)
कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या विपरीत परिणामांमुळे विविध आर्थिक उपाययोजना केल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय नोकरभरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र, आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नोकरभरतीवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सरकारी विभागातील सरळसेवा कोट्यातील ७५ हजार पदे भरण्याची सरकारची योजना आहे. शासनाच्या ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अंतिम झालेला आहे, अशा ठिकाणी सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे १०० टक्के भरण्यास मुभा देण्यात आली आहे.
ज्या विभागांचा सुधारित आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभागांमधील गट अ, गट ब, गट क मधील (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, १२ एप्रिल २०२२ रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पदभरतीवरचे निर्बंध उठवले होते. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने ३० सप्टेबर रोजी आकृतिबंधाची अट टाकून पदभरतीत खोडा घातला. त्याचा फटका नोकर भरतीला बसला होता.
आता नोकरभरतीवरील निर्बंधांतून देण्यात आलेली शिथिलता केवळ स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील पदभरतीसाठी १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या ३० सप्टेंबर २०२२ च्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.