School Children Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Schools : २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार? शिक्षणमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Schools : राज्यातील २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा (School) लवकरच बंद होणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शिक्षण विभागाने याबाबत अहवाल देखील मागवला असल्याची चर्चा आहे. शिक्षण विभागाच्या या धोरणाला पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांकडून विरोध होत आहे. दरम्यान, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी केसरकर यांना शाळा  (Education Department) बंद करण्याबाबत प्रश्न विचारला, या प्रश्नावर राज्यातील २० किंवा त्याहून कमी विद्यार्थी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

या केवळ अफवा असून अफवा पसरवणाऱ्यांच्या तळाशी जाऊन त्यांच्यावरती प्रसंगी कारवाई करू, असा इशारा देखील दीपक केसरकर यांनी दिला आहे. या निर्णयामुळे शिक्षकांच्या नोकऱ्या जातील अशीही अफवा पसरली जात आहे. मात्र, शिक्षकांना सर्विस ऍक्ट नुसार प्रोटेक्शन असते. त्यामुळे अशी कोणतेही घटना घडणार नसल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

२०१७ साली राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना ० ते २० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या राज्यातील ३३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुद्धा अशाच प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यावेळी मात्र, ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांनी या निर्णयाला मोठा विरोध केला होता.

शिक्षण हक्क कायदा काय सांगतो?

शिक्षण विभागाच्या आधीच्या निर्णयानुसार पहिली ते पाचवीच्या शाळा या विद्यार्थ्यांसाठी एक किलोमीटर अंतरावर असाव्यात तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळा तीन किलोमीटर अंतरावर असाव्यात असा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत आणि शाळा जवळ असावी असा शिक्षण हक्क कायदा सांगतो, त्यामुळे अशा प्रकारच्या शाळा बंद झाल्यास शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होईल असं तज्ञांचा म्हणणं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

Dhanishta Nakshatra : धनिष्ठा नक्षत्रातील लोक का असतात वेगळे? स्वभाव, काम आणि रोग जाणून घ्या

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT