Dada Bhuse saam tv
महाराष्ट्र

Dada bhuse : शालेय शिक्षण मंत्र्यांची 'दादा' गिरी; बंद पडलेल्या मराठी शाळेत कार्यालय थाटण्याचा प्रस्ताव

dada bhuse Latest News : नाशिकमधील बंद पडलेल्या मराठी शाळेत कार्यालय थाटण्याचा प्रस्ताव दादा भुसे यांनी मांडला आहे. मात्र, या प्रस्तावाला महापालिकाने मंजुरी दिलेली नाही.

Saam Tv

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : नाशिक महापालिकेच्या बंद पडलेल्या मराठी शाळेत शालेय शिक्षण मंत्र्यांचा कार्यालयाचा प्रस्ताव मांडला आहे. शाळा बंद असल्यानं कार्यालयासाठी उपयोग करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मांडलाय. बंद शाळेत कार्यालय थाटण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून १ कोटींचा खर्च करण्याचा प्रस्ताव आहे. शालेय शिक्षणमंत्र्याच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

शालेय शिक्षण मंत्र्यांनी मराठी शाळा कशा सुरू राहतील, महापालिका जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी, गुणवत्ता वाढावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. मात्र, त्यांनीच बंद पडलेल्या महापालिकेच्या मराठी शाळेत कार्यालयासाठी जागा मागितल्याने शालेय शिक्षण मंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

महापालिकेची शाळा क्रमांक १६ मराठी शाळा ही विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्यानं २०१७ मध्ये बंद झाली आहे सध्या या बंद पडलेल्या मराठी शाळेत सर्व शिक्षा अभियानाचे कार्यालय आणि अंगणवाडीची शाळा सुरू आहे. बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळेत अंगणवाडीचा वर्ग तात्पुरत्या स्वरूपात भरतो.

शालेय शिक्षण मंत्र्यांच कार्यालय महापालिकेचा बंद पडलेल्या शाळेत सुरू झालं, तर अंगणवाडीच्या वर्गाचं काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शालेय शिक्षण मंत्र्यांकडून महापालिकेला कार्यालयासाठी प्रस्ताव आल्याची माहिती महापालिका आयुक्तांकडे पोहोचली आहे. मात्र अद्याप प्रस्तावाला मंजुरी दिली नसल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी दिली.

शालेय शिक्षण मंत्र्यांनी बंद पडलेल्या मराठी शाळा पुन्हा कशा सुरू होतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना स्वतःच्या कार्यालयासाठी जागा मागणं कितपत योग्य? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत अद्याप मंत्री दादा भुसे यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे यावर दादा भुसे काय प्रतिक्रिया देतात, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT