Private School Corruption google
महाराष्ट्र

Private School Corruption: शिक्षण सोडून शाळा बनताहेत 'दलालीचं केंद्र', शिक्षण माफिया कशी करतात पालकांची लूट?

Private School Corruption Investigation : साम टीव्हीच्या तपासात खासगी शाळांची कट प्रॅक्टिस उघड झाली असून पुस्तकं, वह्या, गणवेशावर कमिशन घेऊन पालकांची लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Bharat Mohalkar

राज्यातल्या खासगी शाळा शिकवणं सोडून दलाली करत असल्याचा भांडाफोड साम टीव्हीच्या इन्व्हेस्टीगेशनमध्ये झालाय. शिक्षण माफिया कशा पद्धतीनं कट प्रॅक्टिस करत आहेत? पुस्तक प्रकाशक, दुकानदार आणि शाळा यांच्यात कुणाला किती टक्के कमिशन मिळतं? पाहा या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारा साम टीव्हीचा इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट.

राज्यात शिक्षण माफियांकडून पुस्तकांच्या नावानं सुरु असलेला लुटीचा गोरखधंदा साम टीव्हीनं चव्हाट्यावर आणला... मात्र या लुटीची मालिका फक्त पुस्तकांपुरती मर्यादित नाही... तर त्यामागे आहे राज्याला हादरवणारी मोडस ऑपरेंडी..... शाळा शिक्षण सोडून दलालीचं केंद्र बनत आहेत... आणि शाळा शैक्षणिक साहित्यातील कट प्रॅक्टिसच्या माध्यमातून पालकांना गंडा घालत असल्याचं समोर आलं... त्यानंतर साम टीव्हीनं ही दलाली कशी चालते? त्याचा शोध घेतला आणि पुस्तक प्रकाशक, दुकानदार, दलाल ते शाळा यांच्यात दलाली कशी ठरते? त्याची चक्रावून टाकणारी माहिती समोर आलीय...

ही शिक्षण माफियांकडून विद्यार्थी आणि पालकांची लूट फक्त पुस्तक आणि वह्यांमध्येच सुरू नाहिये... तर शाळांकडून सुरु असलेला लुटीचा गोरखधंदा विद्यार्थ्यांचा गणवेश, शूज आणि इतर शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली सुरुये....त्याबाबत माहिती मिळताच साम टीव्हीनं थेट शैक्षणिक साहित्य निर्मितीचा कारखाना गाठला...

खरंतर सगळंच साहित्य शाळेतून किंवा शाळेनं नेमून दिलेल्या व्हेंडरकडून घेण्याची सक्ती शाळांकडून केली जातेय... त्यासाठी व्हेंडर गणवेश, वह्या, दफ्तरांवर शाळेचा शिक्का मारतात... त्यातून थेट 20 ते 50 टक्क्यांपर्यंत रक्कम वाढवून सुरु होते शाळांची नफेखोरी.... त्याचीही पोलखोल दुकानदारानं साम टीव्हीवर केली...

या शाळांच्या दलालीचा कच्चा चिठ्ठाच सामच्या हाती लागला.. आणि त्यात शाळांनी वाढवलेले रेट चक्रावणारे असल्याचं समोर आलं...

इयत्ता सहावी चा संपूर्ण सेट

शाळेकडून आलेलं रेट कार्ड: ८५२७ रुपये

सामान्य बाजारातील दर: ५५०० रुपये

२०० पानी वही (नोटबुक)

शाळेकडून आलेलं रेट कार्ड: ७५ रुपये

सामान्य बाजारातील दर: ३५ रुपये

प्रोजेक्ट बुक

शाळेकडून आलेलं रेट कार्ड: ९० रुपये

सामान्य बाजारातील दर: ५० रुपये

सायन्स लॅब मॅन्युअल

शाळेकडून आलेलं रेट कार्ड: ५१० रुपये

सामान्य बाजारातील दर: ३०० रुपये

दफ्तर- 350-500 रुपये

बाजारातील किंमतशिक्षण माफिया घोटाळा- 100 रुपये

शूज → विक्री 350-500 रुपये

बाजारातील किंमत - 150 रुपयांचे

हे फक्त पुणे आणि कोल्हापूरपुरतं मर्यादित नाही... तर या कट प्रॅक्टिसची कीड विदर्भातील शाळांनाही लागलीय... त्याचाही भांडाफोड साम टीव्हीनं केलाय..

खरंतर राज्यात सीबीएसई आणि आयसीएसई शाळांचं पेव फुटलंय.. प्रत्येक पालकांना आपलं मूलं या शाळांमध्ये शिकाव असं वाटतंय.. मात्र याच माध्यमाच्या अनेक शाळा लुटीचं केंद्र बनत आहेत... आता शाळा शिक्षणाऐवजी दलालीचं केंद्र बनत असतील... आणि कट प्रॅक्टिसच्या माध्यमातून पालकांची लूट करत असतील तर शिक्षण खातं काय झोपलं आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय.. त्यामुळे आता शालेय शिक्षण मंत्र्यांनी जागं होऊन शैक्षणिक साहित्याच्या नावानं सुरु असलेला बाजार रोखण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.

नागपूरहून पराग ढोबळे आणि कोल्हापूरहून रणजित माजगावकरसह अक्षय बडवे साम टीव्ही न्यूज.... पुणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT