एकनाथ खडसे यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा ईडीची नोटीस
एकनाथ खडसे यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा ईडीची नोटीस Saam Tv
महाराष्ट्र

एकनाथ खडसे यांच्या पत्नीला दुसऱ्यांदा ईडीची नोटीस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव - भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे Eknath Khadse यांच्यामागे ईडीचा ED ससेमिरा अजूनही कायम आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे Mandakini Khadse यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स Noticeबजावले आहे. याआधी देखील त्यांना ईडीने समन्स बजावला होता. पण, त्या चौकशीला हजर न झाल्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

हे देखील पहा -

भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या पत्नी यांना बुधवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविण्यात आले आहे. मंदाकिनी खडसे व जावई गिरीश चौधरी Girish Chaudhari यांच्या नावाने एमआयडीसीची MIDC जमीन खरेदी करण्यात आली आहे. याप्रकरणी जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आले आहेत. चौधरी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.यापूर्वी देखील मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यासाठी मुदत मागून घेतली होती. आता त्यांना आज हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

यापूर्वी देखील पत्नी मंदाकिनी खडसे यांन ईडीने हजर राहण्याबाबत नोटीस Notice बजावली होती. परंतु त्यावेळी प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी हजर राहता येणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता ईडीने पुन्हा नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Update 2024: आनंदवार्ता! येत्या ४८ तासांत मान्सून होणार भारतात दाखल; महाराष्ट्रात कोसळणार तुफान पाऊस

Mithun Rashi Personality : मिथुन राशीची लोक कशी असतात? त्यांचा स्वभाव नेमका कसा असतो? जाणून घ्या राशीबद्दल

Horoscope Today : सुखाची बरसात होईल, संधीचे सोने करून घ्या; जाणून घ्या तुमचे रविवारचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: 'या' राशींसाठी रविवार खास, पैशांची होणार बरसात

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

SCROLL FOR NEXT