ED Raid Nagpur& Mumbai  Saamtv
महाराष्ट्र

ED Raids: मोठी बातमी! महाराष्ट्रात ईडीची कारवाई; मुंबई, नागपुरमध्ये १५ ठिकाणी छापेमारी

या छापेमारीत ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nagpur: ईडीने (अमलबजावणी संचालनालय) महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नागपुर आणि मुंबईसह ईडीने तब्बल १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. या छापेमारीत ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या बद्दलचे ट्विट करत ईडीने कारवाईची माहिती दिली आहे, तसेच अधिक तपास सुरू असल्याचेही सांगितले आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यांमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे. नागपूरचे अनेक स्टील, लोह आणि रिअल इस्टेट व्यावसायिक ईडीच्या रडारवर आहेत. त्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकल्यानंतर त्यांची चौकशी आणि चौकशी सुरू आहे. यामध्ये ५.५१ कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि १.२१ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईनंतर अधिक तपास सुरू असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

या १५ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या सर्वांचा तपास सुरू आहे. याशिवाय अनेकांची फसवणूक करणाऱ्या पंकज मेहाडियाच्या घरावरही छापा टाकण्यात आला आहे.

ईडीने कारवाई केलेला पंकज मेहाडिवर व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तो नागपूरच्या रामदासपेठ परिसरात राहतो. त्याच्यासह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २०२१ मध्ये यांना तुरुंगातही पाठवण्यात आले होते. यानंतर काल ईडीने त्यांच्या घरावर छापा टाकला आहे.

काय आहेत ईडीचे अधिकार..

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा अंतर्गत ‘ईडी’चौकशी करते. सध्या या कारवाईच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ झाली आहे.ईडी परकीय चलन व्यवस्थापन कायदा, १९९९ (FEMA) मदतीनेही ही कारवाई करते. परकीय चलन व्यवस्थापन कायद्यानुसार विदेशी व्यापार तसेच विदेशी आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT