Latur Earthquake, Latur SAAM TV
महाराष्ट्र

Earthquake : भूकंपाच्या लागोपाठ २ धक्क्यांनी ग्रामस्थ भयभीत; प्रशासन सतर्क

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी हे गाव गणेश आगमनाच्या पूर्वीपासूनच त्रस्त आहे.

दीपक क्षीरसागर

Latur : लातूर जिल्ह्यातील हासोरी, बडूर आणि अंबुलगा भागात मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे (earthquake) धक्के जाणवत आहेत. यामुळे या भागातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान प्रशासनाने ग्रामस्थांना (villagers) दिलासा दिसून आपत्ती व्यवस्थापनाकडून सातत्याने आवश्यक त्या उपाययाेजना आखल्या जात आहेत. (Latur Latest Marathi News)

हासोरी, बडूर आणि अंबुलगा भागात काल मध्यरात्री एक वाजून तेरा मिनिटाला 2.1 रीश्टर स्केलचा धक्का बसला होता. तसेच काल रात्री 9 वाजून 57 मिनिटाला 1.9 रीश्टर स्केलचा धक्का जाणवला आहे. यात हासोरी, बडुर, पिरपटेलवाडी आणि अंबुलगा या मुख्य गावांसह या परिसरातील अनेक गावांना धक्का जाणवला आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी साकेब उस्मानी यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील भूकंपमापन केंद्रात या भूकंपाची हालचाल नोंदवण्यात आली आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात आली आहे. (Maharashtra News)

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी हे गाव गणेश आगमनाच्या पूर्वीपासूनच त्रस्त आहे. कारण या गावात सतत जमिनीतून आवाज येत होते. ग्रामस्थांनी वेळोवेळी याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. ग्रामस्थांच्या मतानुसार हे भूकंपाचे धक्के होते. मात्र प्रशासनाने भूगर्भातील हालचालीमुळे जमिनीतून आवाज येत आहे असं सांगत ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला होता. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

SCROLL FOR NEXT