E-Sakal saam tv
महाराष्ट्र

E-Sakal: ई-सकाळचा नवा विक्रम – भारतात मराठी डिजिटल मीडियाचा सन्मान वाढवला!

E-Sakal No.1 Marathi News Portal: मराठीतले नं. १ न्यूज पोर्टलचा ठसा सकाळ समूहाच्या डिजीटल माध्यमाने उमठवला आहे. त्यासह सकाळ समूहाने २५ वर्षांचा प्रवास पुर्ण केला आहे.

Saam Tv

मराठीतले नं. १ न्यूज पोर्टलचा ठसा सकाळ समूहाच्या डिजीटल माध्यमाने उमठवला आहे. त्यासह सकाळ समूहाने २५ वर्षांचा प्रवास पुर्ण केला आहे. अगदी प्रिंट माध्यमापासून ते डिजीटल विश्वापर्यंत हे यश गाठले आहे. त्यासह ई-सकाळनं एक आणखी मोठं यश संपादन केलं आहे. हे संपुर्ण यश वाचक वर्गाच्या पसंतीमुळे मिळाले आहे.

ई-सकाळचा वाचक वर्गाच्या पसंतीमुळे कॉमस्कोरचा आकडा वाढला. त्यामुळे डिजिटल माध्यम विश्वात ई-सकाळने विशेष स्थान पटकावलं. कॉमस्कोरला डिजिटल माध्यमात विशेष आणि महत्वाचे स्थान असते. यात कोणत्या न्यूज पोर्टल्सवर किती वाचक वर्ग आहे याची मोजणी केली जाते. याचा उच्च आकडा यंदा ई-सकाळने पटकावला आहे.

सकाळ माध्यम समुहाने डिजीटल युगात पाऊल टाकत २६ जानेवारी २००० रोजी 'ई-सकाळ' डिजिटलची सुरुवात केली होती. याला २५ वर्षे पूर्ण झाली. त्यासोबत सकाळ माध्यम समुहाच्या अंतर्गच आणखी वेबपोर्टल्स येतात त्याबद्दल आपण पुढील माहितीद्वारे थोडक्यात जाणून घेऊ.

साम टीव्ही : सकाळ माध्यम समुहाचे न्युज चॅनेल असलेल्या साम टीव्हीनेही डिजीटल विश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ व्हिडिओच नाही तर साम टिव्हीच्या वेबसाईटनेही कॉमस्कोर वाढवून यश मिळवलं आहे. यात ब्रेकींग न्यूज, घडामोडी आणि विश्लेषण आपल्या वाचकांपर्यंत जलद गतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.

अ‍ॅग्रोवन:

अ‍ॅग्रोवन हे न्यूज पोर्टल आधुनिक शेती, हवामान अंदाज, कृषी तंत्रज्ञान, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन यासंबंधीत माहिती पोहोचवण्याचे काम करते. हे वेब पोर्टल सकाळ समुहाच्या अंतर्गत येते.

गोमन्तक: गोव्यातील सर्व घडामोडी 'गोमन्तक' या सकाळ समुहाच्या अंतर्गत असलेल्या वेब पोर्टलमध्ये येते. यात गोव्याच्या घडामोडी, सांस्कृतिक कार्यक्रम , पद्धती, राजकीय, सामाजिक आणि पर्यटनाविषयक बातम्यांसाठी हे एक विश्वासार्ह वेब पोर्टल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात जोरदार पावसाला सुरुवात

Yavatmal Rain: पैनगंगा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, यवतमाळ- नांदेडदरम्याची वाहतूक ठप्प, दोन जणांचा मृत्यू

वाहन आणि लायसन्ससाठी आधार अन् मोबाईल अनिवार्य; जाणून घ्या लिंक करण्याची प्रोसेस

Shocking : हृदयद्रावक! बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याने ४ मुलांसह आयुष्य संपवलं

MHADA : म्हाडाचं घर विकता येतं का? जाणून घ्या घराचे नियम

SCROLL FOR NEXT