Devendra Fadnavis On Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis On Ajit Pawar: अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर फडणवीसांची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, कोणालाही...'

Devendra Fadnavis News: अजित पवारांच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे.

मंगेश मोहिते

Devendra Fadnavis News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्रिपदावर दावा केला. अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवारांच्या मुलाखतीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. 'कोणालाही मुख्यमंत्री व्हायला आवडू शकते, अशी सावध प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस हे अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मुख्यमंत्रिपदावरील दाव्यावर भाष्य करताना म्हणाले, 'मी त्यांची मुलाखत पाहिलेली नाही. कोणालाही मुख्यमंत्री व्हायला आवडू शकते. त्यात काही वावगं नाही. अनेकांना असं वाटते की मुख्यमंत्री व्हावे. मात्र प्रत्येकाला होता येतं असं नाही. आमच्या त्यांना शुभेच्छा आहे'.

राज्यातील राजकारणात भूकंप होणार, या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं. राज्याचे राजकारणात भूकंपाची अपेक्षा केली जात असताना तुम्ही एकदम शांत होते, या पत्रकाराच्या प्रश्नावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, 'माझी पण करमणूक होत होती'.

महाविकास आघाडीच्या राजकारणावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. अजित पवार यांना महाविकास आघाडीमधून काही लोक बाहेर ढकलू पाहत आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, 'महाविकास आघाडीमध्ये काय सुरू आहे हे मला माहित नाही. मात्र, मी वारंवार सांगतो आहे, जी वज्रमूठ ते सांगत आहेत. त्या मुठीला एवढ्या भेगा आहे की, ती कधीही वज्रमूठ होऊ शकत नाही. त्याचाच प्रत्यय आपल्याला येत आहे'.

देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर अजित पवार यांच्याकडून काय प्रतिक्रिया दिली जाईल, हे आता पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT