beed, dwarkadas mantri bank election news, dwarkadas mantri bank beed saam tv
महाराष्ट्र

Dwarkadas Mantri Bank : द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची निवडणूक बिनविराेध; जाणून घ्या नवे संचालक मंडळ

सर्व नूतन संचालक मंडळाचे गुलालाच्या उधळणीत काैतुक करण्यात आले.

विनोद जिरे

Dwarkadas Mantri Bank Election News : व्यापाऱ्यांची बँक म्हणून ओळख असणाऱ्या बीडच्या (beed) द्वारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची निवडणूक (dwarkadas mantri bank) बिनविरोध पार पडली आहे. या बँकेच्या अध्यक्षाची निवड येत्या तेरा जानेवारीला होणार आहे.

या निवडणूकीत (election) सभासदांनी पुन्हा एकदा सुभाषचंद्र सारडा यांच्यावर विश्वास टाकला आहे. काही वर्षापूर्वी रिझर्व्ह बँकेने 'मंत्री' बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर बँकेवर प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. त्यानंतर बँकेच्या संदर्भात गुन्हे देखील दाखल करण्यात आले. मात्र या साऱ्या पार्श्वभूमीवर सभासदांनी आपण पुन्हा सुभाषचंद्र सारडा यांच्यासोबत असल्याचेच दाखवून दिले आहे असे आदित्य सारडा (नवनिर्वाचित संचालक) यांच्यासह संचालकांनी नमूद केले. (Maharashtra News)

या बॅंकेच्या (bank) नुतन संचालक मंडळात आदित्य सारडा, आदिती सारडा, गिरीश गिल्डा, शुभम चितलांगे, संतोष लहाने, अरुण मुंडे, राहुल खडके, दिनेश देशपांडे, शेख मोहम्मद सलीम, प्रल्हाद वाघ, रघुनाथ चौधरी, सुधाकर वैष्णव, अंजली पाटील, राम गायकवाड, सतीश धारकर यांचा समावेश आहे. या बँकेच्या अध्यक्षाची निवड येत्या तेरा जानेवारीला होणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT