मुंबईतील नेस्को सेंटर येथे शिवसेनेचा दसरा मेळावा
निवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी पुरुषोत्तम डावरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
श्रीहरी दावरे हे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत.
मुंबईतील नेस्को सेंटरवर आज शिवसेनेचा बहुप्रतिक्षित दसरा मेळावा पार पडतोय. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या मेळाव्याचा अजेंडा दुष्काळग्रस्त शेतकरी ठेवलाय.दरम्यान या मेळाव्यात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश श्रीहरी डावरे यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केलाय.एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय.
न्यायमूर्ती श्रीहरी पुरुषोत्तम डावरे (निवृत्त) हे भारताच्या न्यायव्यवस्थेतील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत. मुंबई येथील महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण अध्यक्षाची जबाबदारी दोनदा संभाळली होती. ६ एप्रिल १९५१ रोजी जन्मलेले न्यायमूर्ती दावरे हे लोकसेवा आणि कायदेशीर परंपरेत खोलवर रुजलेल्या वातावरणात वाढले. त्यांचे वडील, पुरुषोत्तम व्ही. डावरे , हे एक नामांकित वकील आणि पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष होते.
पुण्यातील एनएमव्ही प्राथमिक आणि उच्च विद्यालय, फर्ग्युसन कॉलेज, एस.पी. कॉलेज आणि आयएलएस लॉ कॉलेज यांसारख्या अग्रगण्य संस्थांमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी १९७७ मध्ये पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात वकिलीला सुरुवात केली. जिथे त्यांनी दिवाणी, महसूल, सहकारी आणि बँकिंग कायद्यांमध्ये चौदा वर्षांहून अधिक काळ अनुभव मिळवला.
एक न्यायाधीश ते शिवसैनिक हा प्रवास ९३ ते २०२६ असा ३३ वर्षांचा प्रवास आहे. संविधानाची आणि कायद्याची सेवा मी केली आहे फक्त न्यायालय हा माझा धर्म होता. मला कुठल्या ही पदाची अपेक्षा नाही, स्वार्थ नाही फक्त कायद्याचा अभ्यास जो केला आहे त्याचा उपयोग आपल्या पक्षात करता यावा पक्षाची कायद्याची बाजू भक्कम व्हावी म्हणून मी आलोय.
सामान्य नागरिकांचे प्रश्न पाहून मन अस्वस्थ राहिले होते पण सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देते ती शिवसेना. एकनाथ शिंदे यांना का निवडले कारण हा पक्ष विकासाचा आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारसरणीवर एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. काही लोकांनी बाळासाहेब ठाकरे यांची विचारसरणी सोडली पण नागरिकांनी त्यांना घरी बसवले. एक शाखा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होणे हे फक्त शिवसेनेत होऊ शकतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.