Ahmednagar News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन भावांनी केले विष प्राशन, एकाचा मृत्यू

आत्महत्या करणाऱ्या या भावांकडे एक सुसाईड नोट सापडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> तरबेज शेख

नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून दोन भावांनी विष प्राशन केलं आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

नाशकात सावकारीचं जाळं मोठं असल्याचं या घटनेतून उघड झालं आहे. सावकाराच्या कर्जामुळे नागरिक आत्महत्या करत आहेत. दोन भावांना विष प्राशन केलं आहे. आत्महत्या करणाऱ्या या भावांकडे एक सुसाईड नोट सापडली आहे.

सावकाराने पैशासाठी तगादा लावल्याने कंटाळून विषप्राशन केल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. पैसे वसुलीसाठी सावकाराने दोघा भावांना बेदम मारहाण केली होती. मात्र या घटनेनंतर आता नातेवाईक आक्रमक झाले आहेत. पोलीस ठाण्यात याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. (Nashik News)

नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये हैदोस घालत मृतदेह घेण्यास नकार दिला. तसेच नाशिक-पुणे रोडवर रास्ता रोको देखील त्यांनी केला. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी सावकारीच्या कर्जबाजारीपणामुळे सातपूरमध्ये देखील बाप-लेकाने आत्महत्या केली होती. त्यामुळे नाशिक पोलीस सावकारांना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT