Dudhganga Vedganga Sahakari Sakhar Karkhana Election Result saam tv
महाराष्ट्र

Kolhapur: बिद्री साखर कारखान्याच्या मतमोजणीस प्रारंभ

Bidri Sakhar Karkhana Election Result: एकूण 120 टेबलवर ही मतमोजणी होत आहे.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कागल तालुक्यातील बिद्री येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी (Dudhganga Vedganga Sahakari Sakhar Karkhana Election Result) 89.03 टक्के मतदान झाले. आज (मंगळवार) या निवडणुकीचा निकाल सायंकाळी स्पष्ट हाेणार असून कोल्हापुरातील मुस्कान लॉन परिसरात प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. (Maharashtra News)

श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकूण 56 हजार 91 पैकी 49 हजार 940 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता 173 मतदान केंद्रावर सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. आज सकाळपासून मतमाेजणीस प्रारंभ झाला आहे. एकूण 120 टेबलवर ही मतमोजणी होत असून या परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

दोन्ही आघाडीचे ५० उमेदवार, शेतकरी संघटनेचे दोन आणि चार अपक्ष अशा 56 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले. दरम्यान आज (मंगळवार) मतमोजणीतून निकाल स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सायंकाळी उशीर पर्यंत मतमोजणी पूर्ण होवून निकाल स्पष्ट होईल

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT