मस्कर, साम टीव्ही
नाशिकच्या आदिवासी पाड्यातील महिलांची हंडाभर पाण्यासाठीची ही कसरत रोजची.... पाणीटंचाईमुळे मैलोमैल चालून हंडाभर पाणी मिळतंय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा मधील आदिवासी भागातील महिलांना अशा प्रकारे पाण्यासाठी वणवण भटकावं लागतयं. एकीकडे लाडकीचे लाड पुरवणारे महायुती सरकार, लाडकीच्या पाण्यासाठीच्या व्यथांकडे मात्र कानाडोळा करताना दिसतयं... या महिलांच्या तोंडूनच ऐका पाणीटंचाईच्या भीषण वास्तवाची कहाणी.
नाशिक जिल्ह्यात 1410 कोटी रुपये खर्चाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 1222 योजनांची कामे हाती घेऊनही 15 टक्के कामचं अद्याप पूर्ण झालेत... त्यामुळे नाशिकच्या आदिवासी पाड्यात अद्याप महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय.. त्यात केवळ नाशिक नाही तर यवतमाळमधील कारेगाव इथल्या फासे पारधी महिलांची पाण्यासाठी तारेवरची कसरत सुरुये...ऐकूया या महिलांची व्यथा
अशा स्थितीमुळे राज्यातील जल जीवन मिशन योजनेची कामे कागदावरच राहिलेत का? असा प्रश्न विचारला जातोय... मात्र काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते.
आदिवासी भागातील महिलांची पाण्यासाठी चाललेली कसरत पाहता, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशांना जिल्हाधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवलीय का? असा प्रश्न निर्माण झालाय... त्यात आदिवासी भागातील महिलांची पाण्यासाठी सुरु असणारी परवड कधी संपणार? लाडकीच्या आयुष्यातील ही जीवघेणी कसरत कधी थांबवणार? हाच खरा प्रश्न आहे. सरकारनं पाणीटंचाईतून मार्ग काढायला हवा, अन्यथा लाडकीच्या व्यथा वेदनादायी कथांच्या रुपात समोर येतच राहतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.