Crime: ‘कार हळू चालव’ म्हटल्याने रागाच्या भरात मारहाण; एकाचा मृत्यू! Saam Tv
महाराष्ट्र

Crime: ‘कार हळू चालव’ म्हटल्याने रागाच्या भरात मारहाण; एकाचा मृत्यू!

साध्या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. रागाच रूपांतर साध्या वादात झालं आणि त्यानंतर हाणामारीत हत्येची घटना घडली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: औरंगाबादमध्ये साध्या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. रागाच रूपांतर साध्या वादात झालं आणि त्यानंतर हाणामारीत हत्येची घटना घडली आहे.

हे देखील पहा-

आरोपी सादीकची कार मोहंमद रेहमान यांच्या घराशेजारून भरधाव वेगाने जात होती. भरधाव वेगात कार असल्याने मोहंमद रेहमान यांना त्या कारचा कट बसला. त्यामुळे मोहंमद यांनी कर हळू चालवायची समाज दिली. त्यांनी 'कार हळू चालव' अशी चालकाला समजूत दिली. याचा राग सादिकला अनावर झाला आणि तो मोहम्मद यांच्याशी भांडण करू लागला. त्यानंतर या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि मारहाण करीत सदर व्यक्तीचा खून केला. ही घटना अजिंठ्यात गुरुवारी मध्यरात्री घडली.

मोहंमद शफीयोद्दीन अब्दुल रहेमान (५०) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अजिंठा पोलिसांनी तिघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आली आहे. सादीक ऊर्फ मुन्नाजन मोहंमद (वय-28), शेख जावेदजान मोहंमद शेख (वय-32) आणि शेख अथर जाफर बेग (वय-38) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

हाणामारीसाठी नातेवाईकांना घेऊन;

आजूबाजूच्या लोकांनी वाद मिटवल्यानंतर आरोपी निघून गेला. त्यानंतर आरोपी सादिकने संबंधित घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर सादीकचे नातेवाईक शेख जावेदखान, मोहंमद शेख आणि अथर शेख हे परत घटनास्थळी गेले. रागाच्या भरात त्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. या मारहाणीत मोहम्मद रेहमान रक्तबंबाळ झाले. मात्र उपचाराला नेट असतानाच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी, अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर सादीक ऊर्फ मुन्नाजन मोहंमद, शेख जावेदजान मोहंमद शेख,आणि शेख अथर जाफर बेग या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर याप्रकरणी अजिंठा पोलिस पुढील तपास करत आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT