Kolhapur Saam
महाराष्ट्र

Kolhapur: अंबाबाई अन् जोतिबा मंदिरात शॉर्ट ड्रेसला मनाई, पश्चिम देवस्थान समितीचा निर्णय

Dress Code for Devotees: कोल्हापुरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात आता पारंपरिक पेहराव अनिवार्य करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

कोल्हापुरातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोल्हापुरातील श्रद्धास्थान असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पारंपरिक पद्धतीने कपडे परिधान करावेत, तसेच तोकडे कपडे परिधान करू नये, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, तसेच जोतिबा मंदिर. या दोन्ही मंदिरांमध्ये एक नियम जारी करण्यात आला आहे. आता तोकडे कपडे परिधान करून प्रवेश करणाऱ्या भाविकांना प्रवेश मिळणार नाही आहे. पारंपारिक पद्धतिने कपडे परिधान करणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार असल्याचा निर्णय पश्चिम देवस्थान समितीने घेतला आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने एक अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करत भाविकांना नम्र आवाहन केले आहे की, "धार्मिक विधी आणि मंदिरातील पवित्रतेचा विचार करता, तोकडे कपडे न घालता पारंपरिक पोशाखात मंदिरात प्रवेश करावा." असे आवाहान त्यांनी केले आहे.

अंबाबाई मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. त्यामुळे या मंदिराच्या धार्मिक महत्त्वाला अनुसरून भक्त भाविकांनी पोशाख निवडावा, असे देवस्थान समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे आवाहन महिलांना, पुरूषांना आणि पर्यटकांनाही लागू करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'वंदे मातरम्' विधेयक लोकसभेमध्ये मंजूर

Tamilnadu Government: शाळेत विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी, 'या' राज्य सरकारचा मोठा निर्णय

Karna Mahabharata: महाभारतात कर्णाला कोणकोणते शाप मिळाले होते?

तुम्ही लपून राहू शकत नाही, एक दिवस आम्ही तुम्हाला बाहेर आणू; मल्लिकार्जुन खरगेंचा PM मोदी-अमित शाहांना इशारा

शाळांमध्ये कोणत्या पदार्थांवर बंदी, वाचा संपूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT