बीडच्या धारुर (Beed Dharur) तालुक्यात असणाऱ्या चाटगावच्या, तलावावरील सांडवा अज्ञात माथेफिरूने फोडल्याची संतापजनक घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली आहे. तलावातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला असून प्रचंड प्रमाणात पाणी वाया जात आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
यंदा बालाघाटच्या डोंगरात पट्ट्यात सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे चाटगाव येथील तलाव 98 टक्के भरला होता. यामुळं चाटगाव, दिंद्रुड, संगम या गावांसह पाच ते सहा गावच्या शिवारात शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी या तलावातून वेगवेगळ्या मार्गाने उपलब्ध होत आहे. तर तलावातील संपादित क्षेत्रात काही शेतकऱ्यांनी अनधिकृतपणे पीक लागवड केलेली असून ती पिके पाण्याखाली जात असल्याने, तलावाचा सांडवा फोडण्याचे काम कोणीतरी केले असावे. असा अंदाज वर्तवला जात आहे.
या सांडव्याची चिरेबंदी भिंत एक फूट उंच खोल तर जवळपास चार फूट रुंद फोडण्यात आली आहे. पाण्याचा दाब वाढल्यास भिंतीला मोठे भगदाड पडू शकते. व त्यामुळे संगम सह अनेक गावांना व शेतींना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तर याविषयी चाटगाव, दिंद्रुड व संगम ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला असून कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान पाटबंधारे विभागाचे अभियंता उमेश वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.