डॉ. भारती पवार यांच्या जन आशिर्वाद यात्रेचे नंदुरबार मध्ये जोरदार स्वागत दिनू गावित
महाराष्ट्र

डॉ. भारती पवार यांच्या जन आशिर्वाद यात्रेचे नंदुरबार मध्ये जोरदार स्वागत

डॉ. भारती पवार आज जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करणार

दिनू गावित

नंदुरबार - केंद्रीय सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार Bharti Pawar यांची जनआशिर्वीद यात्रा बुधवारी रात्री उशीरा नंदुरबार Nandurbar मध्ये दाखल झाली. यावेळी नंदुरबार शहरामध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. खास आदिवासी नृत्यांसह शहरातुन त्यांच्या जनआशिर्वाद यात्रेला सुरवात झाली.

हे देखील पहा -

सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांनी माल्यार्पण केले. यानंतर सोनार खुंट. जळका बाजार, गणपती मंदीर परिसर, माणिक चौक हाट दरवाजा, सिंधी कॉलनीमार्गे भाजपाच्या विजय पर्व कार्यालयात त्यांची जनआशिर्वाद यात्रा पोहचली. 

यावेळी ठिकठिकाणी विविध समाजांचे पदाधिकारी आणि शिष्टमंडळाने त्यांचे स्वागत देखील केले.  या यात्रेच्या स्वागतासाठी नंदुरबारच्या खासदार डॉ. हिना गावित, आमदार राजेश पाडवी, भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेक्षाध्यक्ष अशोक उईके, आदिसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. भारती पवार आज जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करणार आहे. तर शहरातील विविध लसीकरण केंद्राचा त्या आढावा देखील घेणार आहेत. यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करुन त्यांची जनआशिर्वाद यात्रा तळोदा तालुक्याकडे रवाणा होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT