DCM Eknath Shinde And Ajit Pawa 
महाराष्ट्र

Dr. Babasaheb Ambedkars birth Anniversary: शिंदे आणि पवारांचं भाषण रोखलं; भाषणाची संधी न मिळाल्याने समर्थक नाराज

DCM Eknath Shinde And Ajit Pawar: महायुती सरकारमध्ये कुरघोडीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता चैत्यभूमीवर कार्यक्रम पत्रिकेत नाव असतानाही शिंदेंचं भाषण वगळण्यात आलं. मात्र शिंदेंचं भाषण कुणी रोखलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कारण - चैत्यभूमी

निमित्त - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा शासकीय कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची ही छापील पत्रिका. कार्यक्रम सुरू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यानंतर राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचंच भाषण झालं. छापील कार्यक्रम पत्रिकेत भाषणासाठी नाव असतानाही एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या नावाला मात्र एनवेळी कात्री लावण्यात आली पुन्हा एकदा महायुतीत वादाची ठिणगी पडली. मात्र या कार्यक्रमाचा घटनाक्रम कसा होता? पाहूयात

नियोजित कार्यक्रमानुसार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं भाषणासाठी नाव

ऐनवेळी मुख्यंमत्री आणि राज्यपालांचंच भाषण

नाराज अजित पवारांनी राज्यपालांच्या भाषणापुर्वीच काढता पाय घेतल्याची चर्चा

भाषणाची संधी न मिळाल्याने शिंदे समर्थक नाराज

एकीकडे चैत्यभूमीवरच्या कार्यक्रमात राज्यपालांचं भाषण सुरु असतानाच अजित पवार निघून गेले.. तर भाषणाची संधी न मिळाल्याने नाराज शिंदेंनी ठाण्यात पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली....एवढंच नाही तर कार्यक्रम पत्रिकेत नेमका कुणी बदल केला? त्याची चौकशी करण्याचे आदेशच शिंदेंनी दिले असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

महायुतीतील धुसफूशीची चंद्रकांत पाटलांनी एकप्रकारे कबुलीच दिलीय.तर दरेकरांनी मात्र नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्यात. हे असं असलं तरी भाषणावेळी डावलण्याची ही पहिलीच घटना नाही... याआधीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिवरायांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आले असतानाही असाच प्रकार घडला.

रायगडावरील कार्यक्रम पत्रिकेतही शिंदे आणि अजित पवारांचं नाव नव्हतं. मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंना भाषण करण्याची संधी दिली आणि अजित पवारांना डावलण्यात आलं.. त्याची चर्चा सुरु असतानाच आता पुन्हा एकदा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुरुय. त्यामुळे हा महायुतीतील विसंवाद आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना डावलण्याचा खेळ? याचीच चर्चा रंगलीय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mosquitoes : दारू पिणारे डासांना चावायला आवडतात? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Manoj Jarange : 'मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करा'; कुणी केली सरकारकडे मागणी? VIDEO

Liver Cancer Symptoms: तुम्हाला सामान्य वाटणारी ही लक्षणं असून शकतात लिव्हर कॅन्सरची; शरीराच्या 'या' बदलांवर लक्ष द्या

Pratap Sarnaik : 'मी हिंदी बोलतो, तुम्हीही बोला', सरनाईकांच्या हिंदी भाषिकांसाठी पायघड्या

Maratha Reservation : अखेर मराठा समाजाला मोठा दिलासा, उच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT