धक्कादायक! मोबाइलवर डेस्क डाउनलोड करणे पडले महागात
धक्कादायक! मोबाइलवर डेस्क डाउनलोड करणे पडले महागात Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! मोबाइलवर डेस्क डाउनलोड करणे पडले महागात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत घोरमारे

भंडारा : धक्कादायक! तुम्ही ऐनी डेस्क (Any desk) चा वापर करताय सावधान? ऐनी डेस्क डाउनलोड Download करून, दुसऱ्याला एक्सेस Access देत आहे, तर जरा जपुन. ही बातमी तुम्हाला विचार करायला भाग पाडु शकते. मोबाइलवर ऐनी डेस्क ऐप डाउनलोड करून, दुसऱ्याला एक्सेस देने एका तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. Downloading desks on mobile is expensive

मोबाइलवर Mobile एक्सेस मिळाल्यावर फोन पे Phone Pe चा वापर करत, एका भामटयाने चक्क ९४ हजार ९९० रुपये तिच्या एकाउंट मधून, आपल्या खात्यात वळविल्याची घटना घड़ली आहे. यामुळे आता हे भामटे ऑनलाइन Online चोरीसाठी ऐनी डेस्क ऐप वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा-

भंडारा जिल्ह्याच्या पांढराबोडी गावातील सेलिना नामक २१ वर्षीय तरुणीला तिच्या मोबाइल वर एका भामटयाचा कॉल केले. आपण फ़ोन पे कंपनीचा मैनेजर अविनाश शर्मा असल्याचे सांगितले. फोन पे नोटिफिकेश वाचले नसल्याचे, सांगून एकाउंट बंद होणार असल्याची माहिती दिली. जर फोन पे बंद करायचे नसल्यास नोटिफिकेशन एक्सेप्ट करण्यास सांगितले. Downloading desks on mobile is expensive

मात्र, आपल्याला हे ऑपरेट करता येत नसल्याचे, पीडिताने सांगितल्यावर संबधित भामटयाने पीड़िताला गूगल प्ले स्टोअर मधून ऐनी डेस्क एप्प्स मोबाइल मध्ये डाउन लोड करण्यात सांगून पीडिताला एक्सेस मागत फोन पे चा यूपीआय UPI नंबर मिळविला, आणि तब्बल ९४ हजार ९९० रुपये आपल्या खात्यात वळविले आहे. याची माहिती पीडिला कळताच तिने भंडारा सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे.

सायबर पोलीस आता संबधित भामटयाच्या शोध घेत आहे. काही दिवसापासून फेसबुक आणि सोशल मीडिया प्लेटफार्म वरुण फसवणुकीचे प्रकार जिल्ह्यात वाढले, असतांना पोलिसांकडून सावध राहण्याचे आवाहन जरी करीत असले, तरी नागरिक मात्र अश्या फसव्या व्यक्तीच्या जाळात सहज अडक़त असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे ऐनी डेस्क वापर करणाऱ्यानी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला ऐनी डेस्कचा एक्ससेस देतांना जरा जपुन राहन्याचे गरजेचे आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report | पुणे येथील Hit And Run प्रकरणातील अल्पवयीन मुलाला 12 तासात जामीन

Special Report | पैज लावाल, तर मग तुरुंगात जाल! दोन मित्रांना पैज चांगलीच भावली..

Pune hit And Run Case : पुणे हिट अँड रन प्रकरण; 'त्या' अल्पवयीन मुलाला काय झाली शिक्षा? जाणून घ्या

Today's Marathi News Live: नवी मुंबईत या वाहनांना प्रवेश बंदी, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Pune Hit and Run Case | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे प्रताप उघड

SCROLL FOR NEXT