मराठा तरुणांना नक्षलवादी होण्यासाठी भाग पाडू नका : नरेंद्र पाटील  कैलास चौधरी
महाराष्ट्र

मराठा तरुणांना नक्षलवादी होण्यासाठी भाग पाडू नका : नरेंद्र पाटील

पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, आमच्यावर पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही केली गेली. यानंतर आम्ही तारीख सांगणार नाही तर डायरेक्ट अटॅक करू असा इशारा पोलिस यंत्रणेला दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

सोलापूर - सोलापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराज चौकातून मराठा आक्रोश मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला यावेळी बहुसंख्य मराठा समाज एकवटल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नरेंद्र पाटील यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांना संबोधित करत मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका असा इशारा करत आरक्षण देण्याची मागणी राज्य सरकारला केली.Don't force Maratha youth to become Naxalites: Narendra Patil

हे देखील पहा -

पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, सोलापुरातून निघालेला हा आक्रोश मोर्चा आता राज्यभर निघणार असून येथे आमच्यावर पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही केली गेली. मात्र आम्ही परवानगी घेतली, तारीख जाहीर केली त्यामुळेच आम्हाला त्रास झाला म्हणून यानंतर आम्ही तारीख सांगणार नाही तर डायरेक्ट अटॅक करू असा इशारा पोलिस यंत्रणेला दिला.

आमची भावना चांगली होती. मोर्चा हा सरकारच्या विरोधात निघत असतो विरोधकांच्या विरोधात निघत नसतो असे सांगत तुम्ही पोलिस यंत्रणेला खिशात घातले असून जर पोलिसांचा असाच वापर होत राहिला तर भविष्यात वाझे प्रमाणे इतर पोलिस देखील वेगवेगळ्या प्रकरणात अडकतील असा इशारा देखील त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.

त्यामुळे पोलिस यंत्रणेने देखील विचार केला पाहिजे असे सांगत पोटाला बॉम्ब लावीन असे म्हणलो तर एवढी घाबर गुंडी झाली. त्यामुळे माझी एवढीच विनंती आहे की मराठा तरुणांना नक्षलवादी होऊ देऊ नका आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer Bhurji Recipe: झटपट, चविष्ट आणि प्रोटीनयुक्त नाश्त्यासाठी बनवा पनीर भुर्जी, वाचा सोपी रेसिपी

Kidney Damage : किडनी खराब होण्याआधी त्वचेवर दिसतात 'हे' ५ संकेत, वेळीच व्हा सतर्क

Tenant Rights : घर सोडताना घरमालक डिपॉझिटमधून पेंटिंगचे पैसे कापतोय? जाणून घ्या काय सांगतो कायदा

Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! स्पर्धा परीक्षा अकॅडमीत ३ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाचं बिंग फुटलं

Woman Fitness Tips: पाठदुखी, थकवा आणि अशक्तपणा होईल दूर; महिलांनी रोजच्या सवयींमध्ये करा हे 8 बदल

SCROLL FOR NEXT