Dombivali News Saam tv
महाराष्ट्र

Dombivali : रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार कमानीवरून डोंबिवली नावच गायब; उबाठाकडून आंदोलनाचा इशारा

Dombivali News : रेल्वे स्टेशन परिसरात उभारण्यात आलेल्या ८ प्रवेशद्वारांवर डोंबिवलीला उपमा देण्यात आलेली नवे झळकत आहेत. पण डोंबिवली नावाचा उल्लेख कोणत्याच कमानीवर पाहण्यास मिळत नाही.

Rajesh Sonwane

संघर्ष गांगुर्डे

डोंबिवली : गेल्या वर्षभरापासून डोंबिवली रेल्वे स्थानकाचे कोट्यवधी रुपयांचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. स्टेशनला एक नवा चेहरा मिळत आहे. मात्र रेल्वे स्थानकाच्या कमानीवरून डोंबिवली नावच गायब झाले आहे. दरम्यान ठळक अक्षरात असलेले डोंबिवली नाव न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा उबाठा कडून देण्यात आला आहे. 

डोंबिवली रेल्वे स्थानकाचे गेल्या वर्षभरापासून कोट्यवधी रुपयांचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. अर्थात स्टेशनला एक नवा चेहरा मिळत आहे. याठिकाणी वाढीव जिने, सरकते जिने, शेड्स उभारले जात आहेत. पण हे सुशोभीकरण इतके प्रभावी ठरले आहे की, खुद्द 'डोंबिवली' हे मूळ नावच स्थानकाच्या प्रवेशद्वारांच्या कमानी वरून गायब झाले आहे. यावरून शिवसेना उबाठाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.  

कोणत्याच कमानीवर नावाचा उल्लेख नाही 

डोंबिवलीला मिळालेल्या उपमा, जसे की नाट्यनगरी, क्रिडानगरी, साहित्यनगरी या नावांच्या कमानी सर्व ८ प्रवेशद्वारांवर झळकत आहेत. पण डोंबिवली नावाचा स्टेशन परिसरातील कोणत्याच कमानीवर कोठेच उल्लेख पाहण्यास मिळत नाही. यामुळे बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना आपण नक्की कोणत्या स्टेशनवर आहोत? याचा मोठा गोंधळ होत आहे. 

उबाठाचा आंदोलनाचा इशारा 

या गंभीर प्रकारानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमोद गोपीनाथ कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन देत मूळ नाव ठळक अक्षरात त्वरित लावावे आणि रेंगाळलेली कामे पूर्ण करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. तर डोंबिवली हे मूळ नावच कुठेच दिसत नसल्याने स्थानकाचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करताना रेल्वे प्रशासनानं जणू ओळखच मिटवली आहे. असे वाटत आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गानं लाज आणली, उदघटानाला जाण्यास गडकरींचा नकार

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! बड्या ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुठे कोणाची नियुक्ती? वाचा

Shivali Parab: शिवाली परबचा नवा ग्लॅमरस लूक; सिल्व्हर बॅकलेस गाऊनमध्ये कल्याणच्या चुलबुलीचा जलवा

Maharashtra News Live Update: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील मराठा बांधव उतरले रस्त्यावर

Bedroom Vastu Tips: बेडरूममध्ये आरसा ठेवावा की नाही? वास्तुशास्त्र काय सांगते?

SCROLL FOR NEXT